वरूण चक्रवर्तीने जिंकले सर्वांचे मन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय क्रिकेट सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. एकीकडे टीम इंडियाचा महान फिरकी गोलंदाज अश्विनच्या निवृत्तीने सर्वांना धक्का बसला होता, पण त्याच दरम्यान भारताला एक नवीन गूढ आणि कमालीचा असा फिरकी गोलंदाज मिळाला आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही.
गेल्या ५ महिन्यांत, हा खेळाडू शून्यावरून हिरो झाला. आता त्याला आयसीसीच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. आपण भारताच्या रहस्यमय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीबद्दल बोलत आहोत जो इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेचा हिरो ठरलाय.
ICC पुरस्कारासाठी नामांकन
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर चक्रवर्ती यांना गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पुरुष क्रिकेटपटू ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले. त्याने पाच सामन्यांमध्ये ९.८५ च्या प्रभावी सरासरीने आणि ७.६६ च्या इकॉनॉमी रेटने १४ विकेट्स घेतल्या. चक्रवर्तीने टी-२० विश्वविजेत्या भारताला घरच्या मैदानावर ४-१ अशी मालिका जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
IND vs ENG 1st ODI: भारताचा इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय; शुभमन-श्रेयसच्या जोडीची कमाल, ‘हीटमॅन’ फेल
५ महिन्यात बदललं नशीब
गेल्या ५ महिन्यांत वरुण चक्रवर्तीचे नशीब चमकले आहे. आता तो टी-२० स्वरूपात टीम इंडियाचा कणा बनला आहे. त्याने २०२१ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले, पण नंतर त्याला वगळण्यात आले. २०२४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर चक्रवर्तीने पुनरागमन केले आणि अनेक विकेट्स घेतल्या. ऑक्टोबरपासून त्याने गेल्या १२ सामन्यांमध्ये ३१ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याने बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आहे.
इतर नामांकित खेळाडू
पुरुषांच्या गटात वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकनलाही स्थान देण्यात आले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत संघाला बरोबरी साधण्यास मदत केली. डावखुरा फिरकी गोलंदाज वॉरिकनला पाकिस्तानविरुद्ध मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. तो १९ विकेट्ससह मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज होता. या पुरस्काराच्या शर्यतीत पाकिस्तानचा नोमान अली देखील आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने १६ विकेट्स घेतल्या.
द्वारकानाथ संझगिरी क्रिकेट साहित्यातील ‘अवलिया’ समीक्षक, जाणून घ्या सर्व माहिती
वरुण चक्रवर्तीच्या खेळांशी संबंधित काही आकडेवारी: