शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता(फोटो-सोशल मीडिया)
रेव्हस्पोर्ट्झमधील एका वृत्तानुसार, २६ वर्षीय गिलला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही दिवस लागणार आहे, ज्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी त्याची उपलब्धता असण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. शनिवारी सकाळी त्याला तीव्र मानदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला खेळ सोडून जावे लागले. तो मैदानातून निवृत्त झाला.
हेही वाचा : IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले
कोलकाता कसोटीतील दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात गिलने ३ चेंडूत ४ धावा काढल्या परंतु मानदुखीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रात्रभर वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्याला औषधोपचार देण्यात आले असून वैद्यकीय पथकाला वाटते की त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही वेळ लागेल. गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतीय संघ गिलच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, परंतु सध्या त्याचा सहभाग अत्यंत संशयास्पद असल्याचे मानला जाऊ लागला आहे.
शुभमन गिलच्या अनुपस्थितीमध्ये, दुखापतीतून सावरलेल्या ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी संघाची धुरा सांभाळली. जर शुभमन गिल दुसऱ्या कसोटीसाठी अनुपलब्ध असेल, तर पंत गुवाहाटी कसोटीत देखील संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. शुभमन गिलला क्रमांक ४ वर संधी दिली जाईल का हे पाहणे देखील महाबगत्वचे असणार आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये, भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल म्हणाला, की गिलची समस्या “रात्री योग्य झोप न मिळाल्यामुळे” झाली असावी. त्याने असे देखील स्पष्ट केले की, हे कोणत्याही फिटनेस समस्यांमुळे झाले नाही. मॉर्केल म्हणाला की, “शुभमन हा खूप तंदुरुस्त खेळाडू आहे आणि तो स्वतःची खूप काळजी घेतो. दुर्दैवाने, आज सकाळी त्याच्या मानेला कडकपणा आला, ज्यामुळे तो दिवसभर त्रास देत राहिला.”






