गौतम गंभीर आणि कपिल देव(फोटो-सोशल मीडिया)
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) च्या शताब्दी चर्चासत्रात बोलताना कपिल देव म्हणाले की, आजच्या घडीला ‘कोच’ या शब्दाचा अर्थच बदलून गेला आहे. “कोच म्हणजे जो तुम्हाला शाळा किंवा कॉलेजच्या काळात खेळ शिकवतो, तंत्र विकसित करतो. माझ्यासाठी तेच खरे कोच आहेत. गौतम गंभीर लेगस्पिनर किंवा विकेटकिपरचा कोच कसा असू शकतो? तो कोच नसून संघाचा मॅनेजर होऊ शकतो,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
हेही वाचा : IND vs SA 5th t20I : हार्दिक पांड्याचा रोमॅंटिक अंदाज! अर्धशतक ठोकताच माहिका शर्माला दिला फ्लाइंग किस
पुढे बोलताना कपिल देव म्हणाले की, आधुनिक क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका कोचिंगपेक्षा मॅन मॅनेजमेंटची अधिक आहे. मॅनेजर म्हणून तुम्ही खेळाडूंना प्रेरित करू शकता. युवा खेळाडू तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तेच सर्वात महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले. याच चर्चेत कपिल देव यांनी सुनील गावसकर यांच्याबाबतही मोठे विधान केले. जर सुनील गावस्कर आजच्या काळात खेळत असते, तर ते टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज ठरले असते. ज्यांचा डिफेन्स मजबूत असतो, त्यांना आक्रमक खेळ करणे सोपे जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा सामना शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर ५ बाद २३१ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघ २० षटकात २०१ धावाच करू शकला. परिणामी भारतीय संघाने हा सामना ३० धावांनी जिंकला आणि मालिका ३-१ अशी जिंकली.






