फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका : भारतीय T20 संघाची धुरा आता सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने T२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पद देण्यात आले आहे. भारताचा संघ साऊथ आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना विश्वचषकामध्ये खेळले होते. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये T२० विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताच्या संघाने विजय मिळवला आणि टीम इंडिया विश्वविजेती झाली. आता भारताचा संघ पुन्हा त्यांच्याविरुद्ध मालिका खेळणार आहे. परंतु विश्वचषकामध्ये खेळलेला संघ आणि आता युवा संघामध्ये मोठे बदल झाले आहेत. परंतु क्रिकेट विश्वामध्ये साऊथ आफ्रिकेचा एक मजबूत संघ मानला जातो. त्यामुळे ते विश्वचषकामधील बदला घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.
भारताच्या संघाने विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात झालेल्या T२० मालिकेमध्ये एकही पराभव झालेला नाही. त्यामुळे भारताचा संघ सध्या T२० फॉरमॅटमध्ये मजबूत स्थितीत उभा आहे. भारताच्या संघाची बीसीसीआयने सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या T२० मालिकेची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये घेतले आहे. T२० फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाज म्हणून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन संघामध्ये कायम असणार आहेत. तर रिंकू सिंगने सुद्धा त्याची जागा पक्की केली आहे, त्याचबरोबर संघामध्ये नितीश कुमार रेड्डीच्या जागेवर तिलक वर्मा संघामध्ये स्थान मिळाले आहे. जितेश शर्माला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या संघामध्ये असणार आहे. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये हार्दिक पंड्याने कमालीची कामगिरी केली होती.
अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वरून चक्रवर्ती हे तीन फिरकी गोलंदाज असणार आहेत. मागील बांग्लादेश विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये वरून चक्रवर्तीने कमालीची कामगिरी केली होती. वेगवान गोलंदाजामध्ये अर्शदीप सिंह, विजयकुमार विशेष, आवेश खान आणि यश दयाल यांना वेगवान गोलंदाजांच्या यादीत सामील केले आहे. विजयकुमार विशेष आणि रमनदीप सिंह हे संघामध्ये नवे चेहरे दिसणार आहेत.
🚨 NEWS 🚨
Squads for India’s tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced 🔽#TeamIndia | #SAvIND | #AUSvIND pic.twitter.com/Z4eTXlH3u0
— BCCI (@BCCI) October 25, 2024
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक, अवेश खान , यश दयाल.