फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरूध्द श्रीलंका ट्राय सिरीज मालिकेचा फायनलचा सामना : भारतीय महिला संघाचा आज सामना श्रीलंका महिला संघाशी होणार आहे. श्रीलंकेमध्ये होणारी ट्राय सिरीज या मालिकेमध्ये तीन संघ सहभागी झाले होते. यामध्ये दक्षिण आफ्रिका, भारत आणि श्रीलंका या तीन देशांचा समावेश होता. या मालिकेत जे दोन संघ चांगली कामगिरी करतील ते फायनल सामना खेळतील आणि एक संघ यामधून बाहेर होणार होता. भारताच्या संघाने चार सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहेत तर श्रीलंकेच्या संघाने फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एक सामन्यात विजय मिळवण्यात यश मिळाले आहे. भारताच्या संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात कमालीची कामगिरी केली आहे, आता भारतीय महिला संघा ची नजर ही मालिकेच्या ट्रॉफीवर असणार आहे.
या मालिकेचा एक सामना भारताचे संघाला गमवावा लागला होता तोच सामना श्रीलंकेविरुद्ध होता. त्यामुळे फायनलच्या सामन्यांमध्ये भारतीय संघासमोर श्रीलंकेचा संघ आव्हान उभे करू शकतो. भारताच्या संघाला श्रीलंकेविरुद्ध पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये तीन विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेचा शेवटचा साखळी सामना भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता. यामध्ये भारताचे संघाने दक्षिण आफ्रिकेला 23 धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे कासवी गौतम हिला दुखापतीमुळे संघा बाहेर पडावे लागले आहे. तिच्या जागेवर क्रांती गौड हिला संघामध्ये सामील केले होते.
Indo Pak War : परदेशी खेळाडू लागले रडायला! पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटांमुळे मिचेल आणि टॉम करन घाबरले
भारताच्या संघाने या ट्राय सिरीजमध्ये तीन नव्या खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली होती. यामध्ये सूची उपाध्याय, श्री चरणी आणि काशवी गौतम या तीन खेळाडूंनी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. भारतीय संघासाठी प्रतिका रावलने फलंदाजीमध्ये दमदार सुरुवात केली आणि जेमिमा रॉड्रिक्स हिने या मालिकेमध्ये कमालीची फलंदाजी केली आणि तिचे आंतरराष्ट्रीय दुसरे अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिका विरुद्ध रॉड्रिक्सने 123 धावांची खेळी खेळली.
दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आत्तापर्यंत भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेचा संघ 34 एक दिवसीय सामनांचा मध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये 2005 मधील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता तर भारताने तीन सामन्यात विजय मिळवला आहे आणि तीन सामने श्रीलंकेच्या संघाने जिंकले आहेत.
कोलंबोच्या हवामानावर नजर टाकली तर कोलंबोमध्ये सकाळी 7 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाणेफेक होण्यासाठी किंवा सामना सुरू होण्यासाठी उशीर होऊ शकतं त्याचबरोबर ढगाळ वातावरण आणि तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असे सांगितले जात आहे.