यशस्वी जैस्वाल(सोशल मीडिया)
Yashasvi Jaiswal’s historic innings : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ गडी गमावून ३१८धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार नाबाद दीड शतकी खेळी करून भारताला मजबूत स्थितीत पोहचवले आहे. तो १७३ धावा काढून नाबाद आहे. या खेळीसह त्याने एक मोठा विक्रम केला आहे. त्याबाबद्दल आम जाणून घेऊया.
यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. जयस्वालने त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी १४५ चेंडूंचा सामना केला. दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, जयस्वालने २५३ चेंडूत २२ चौकारांसह १७३ धावा केल्या होत्या. या काळात जयस्वालने अनेक महत्त्वाचे विक्रम देखील प्रस्थापित केले आहे.
यशस्वी जयस्वालने आजवर कसोटीत सात शतके झळकावली असून त्यापैकी पाच शतके १५० किंवा त्याहून अधिक धावांचे आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २४ वर्षांचा होण्यापूर्वी, फक्त डॉन ब्रॅडमन यांनीच जयस्वालपेक्षा जास्त वेळा १५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याची किमया साधली आहे. ब्रॅडमन यांनी २४ वर्षांचे होण्यापूर्वीच आठ वेळा १५० किंवा त्याहून अधिक धावा फटकावल्या आहेत.
जयस्वाल हा पदार्पणापासून सर्वाधिक कसोटी शतके करणारा भारतीय सलामीवीर ठरला आहे. पदार्पणापासून भारतीय सलामीवीरांनी एकत्रितपणे सहा शतके ठोकली आहेत. दरम्यान, जयस्वालच्या पदार्पणापासून इतर सलामीवीरांनी चार शतके झळकवली आहेत. हे जयस्वालचा सातत्यपूर्ण कामगिरी दर्शवते.
दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्याट दुसराय कसोटी सामना खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय क्रिकेट संघ मजबूत स्थितीत आहे. भारताने दोन विकेट गमावून ३१८ धावा उभ्या केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल १७३ धावाआणि कर्णधार शुभमन गिल २० धावांसह नाबाद आहेत.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या सलामीवीर जोडीने डावाची सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भक्कम भागीदारी रचून काहनगली सुरवात केली. केएल राहुल ३८ धावांवर माघारी गेला.
तिसऱ्या क्रमांकावर आलेला, साई सुदर्शनने चांगली फलंदाजी करत त्याने १६५ चेंडूंमध्ये १२ चौकारांसह ८७ धावा फटकावल्या. सुदर्शन आणि जयस्वाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी त्याची १९३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवले.
हेही वाचा : IND VS PAK : ‘ना भारताने विचारले ना काही…’, आशिया कप ट्रॉफीबाबत मोहसीन नक्वीची भूमिका वाकडी ती वाकडीच..
जयस्वालने २५३ चेंडूचा सामना करत १७३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २२ चौकार लगावले आहेत. आता पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जयस्वाल १७३ धावा तर शुभमन गिल २० धावा काढून नाबाद आहेत. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकनने दोन बळी घेतले.