ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 339 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs AUS W Semi Final Live : आज महिला एकदिवसीय विश्वचषकात आज दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आलेत. हा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामान्यायाधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत फोबी लिचफिल्डच्या शतकाच्या जोरावर सर्वबाद ३३८ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताला विजय मिळवायचा असेल तर आता ३३९ धावा कराव्या लागणार आहे. भारताकडून श्री चरणी २ विकेट्स घेऊन फायदेशीर गोलंदाज ठरली.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरवात खराब झाली.फोबी लिचफिल्ड आणि एलिसा हीली या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. मात्र २५ धावांवर ऑस्ट्रेलियाला कर्णधार एलिसा हीलीच्या रूपात पहिला झटका बसला. ती ५ धावा करून क्रांति गौडची शिकार ठरली. त्यानंतर एलिस पेरी मैदानात आली.लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरालाच नाही तर संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. दरम्यान लिचफिल्डने फक्त ७७ चेंडूत शानदार शतक झळकावले. तिने ९३ चेंडूत ११९ धावा केल्या. यामध्ये तिने १५ चौकार मारले. तीला अमनजोत कौरने बाद केले. मात्र, तोपर्यंत लिचफिल्ड आणि एलिस पेरी या दोघींनी चौथ्या विकेट्ससाठी १५५ धावांची भागीदारी रचली होती.
त्यानंतर एलिस पेरी ८८ चेंडूत ७७ धावा करून बाद झाली. या खेळीत तिने ६ चौकार आणि २ षटकार मारले. तीला राधा यादवने बाद केले. बेथ मूनी २४ धावा, अॅनाबेल सदरलँड ३ धावा करून बाद झाल्या. अॅशले गार्डनरने चांगली फटकेबाजी करत आपल्या संघालला मजबूत स्थितीत पोहचवले. तिने ४५ चेंडूत ६३ धावा केल्या. या खेळीत तिने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. ताहलिया मॅकग्रा १२ धावा, सोफी मोलिनेक्स ० धावा, अलाना किंग ४ धावा, किम गार्थ १७ धावा काढून बाद झाल्या तर मेगन शट १ धावा काढून नाबाद राहिली. भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर क्रांति गौड, अमनजोत कौर आणि राधा यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.
बातमी अपडेट होत आहे…






