Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tri Nation A series: तिलक वर्मा ब्रिगेडची कमाल; अफगाणिस्तानला चारीमुंड्या चित करत फायनलमध्ये धडक! अंतिम सामना कधी?

India A Beat Afghanistan Reached Final inTri nation Series: भारत 'अ' संघाने अफगाणिस्तान 'अ'चा १०१ धावांनी पराभव करत त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला. दांबुला येथे झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३१९ धावा केल्या, तर अफगाणिस्तानचा डाव २१८ धावांत संपुष्टात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 18, 2026 | 01:14 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • तिलक वर्मा ब्रिगेडची कमाल
  • अफगाणिस्तानवर ऐतिहासिक विजय
  • अंतिम सामना कधी?
भारत ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ यांच्यातील त्रिकोणीय मालिकेतील पाचवा सामना भारत ‘अ’ संघाने १०१ धावांनी जिंकला. हा सामना दांबुला येथे खेळला गेला, जिथे अफगाणिस्तान ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारताने ५० षटकांत ९ विकेट्स गमावून ३१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तान संघ ३६.५ षटकांत २१८ धावांवर सर्वबाद झाला. भारताने अफगाणिस्तावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह, भारतीय संघ श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दरम्यान, या स्पर्धेचा अंतिम सामना कधी खेळला जाईल, जाणून घ्या.

FIFA World Cup 2026: मैदानावर फुटबॉल नव्हे, थेट विषारी साप! जर्मनीची टीम थोडक्यात बचावली

ट्राय सीरीजमध्ये भारताची कामगिरी

श्रीलंकेत सुरू असलेल्या त्रिपक्षीय क्रिकेट स्पर्धेत भारताची कामगिरी आतापर्यंत संमिश्र राहिली आहे. भारत ‘अ’ संघाने या त्रिकोणीय मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. संघाने एक सामना जिंकला असून दोन गमावले आहेत. संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला ८ धावांनी निसटता पराभूत केले. त्यानंतर त्यांना अफगाणिस्तानकडून दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पावसामुळे खेळात व्यत्यय आल्याने या सामन्याचा निकाल डकवर्थ-लुईस पद्धतीने ठरवण्यात आला. श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना सुरुवातीला बरोबरीत सुटला होता, पण संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला. आता, चौथ्या आणि अंतिम साखळी सामन्यात भारताने अफगाणिस्तानला १०१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. भारताकडे दोन गुण आहेत. दरम्यान, श्रीलंकेने आपल्या तीनपैकी दोन सामने जिंकले असून तो अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तानने आपल्या दोनपैकी एक सामना गमावला असून भारताविरुद्ध विजय मिळवला आहे.

तिलक वर्माकडे संघाचे नेतृत्व पण नजरा वैभव सूर्यवंशीवर

या स्पर्धेत तिलक वर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत, पण सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर आहेत, जो सध्या आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. वैभवने टी-२० मध्ये भरपूर धावा करून स्वतःला सिद्ध केले आहे, पण एकदिवसीय सामन्यांमध्ये तो अद्याप आपली छाप सोडू शकला नाही. ४ सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. पण आता भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे त्याला आणखी एक संधी मिळेल.

कधी अन् केव्हा होणार ट्राय सीरीजचा फायनल सामना

भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. परंतु, दुसरा संघ अजून निश्चित झालेला नाही. शुक्रवार, १९ जून रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळला जाईल. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल. त्रिकोणीय मालिकेचा अंतिम सामना रविवार, २१ जून रोजी खेळला जाईल. या दिवशी वैभवला एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी करून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध करण्याची संधी मिळेल. हा सामना सकाळी १० वाजता सुरू होईल.

IND vs AFG: शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी; कोहली-द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला

Web Title: India a beat afghanistan a by 101 runs reach tri nation series final vaibhav suryavanshi opportunity final date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • India A Team
  • Tilak Verma
  • Tri Series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs AFG  : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..
1

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप
2

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
3

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
4

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.