फोटो सौजन्य - X
महेंद्र गुर्जर : स्वित्झर्लंडमधील नॉटविल वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धा पार पडली. यामध्ये भारताचे महेंद्र गुर्जरने त्याच्या नावावर विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. स्वित्झर्लंडमधील नॉटविल वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली. पुरुषांच्या भालाफेक F42 या कॅटेगिरीमध्ये महेंद्र गुर्जर याने रेकॉर्ड नावावर केला आहे. या स्पर्धेमध्ये महेंद्र गुर्जर 61.17 मीटर भाला फेकुन रेकॉर्ड नावावर करुन सुवर्णपदक जिंकले आहे. २७ वर्षीय या खेळाडूने २०२२ मध्ये ब्राझीलच्या रॉबर्टो फ्लोरियानी एडेनिलसनचा ५९.१९ मीटरचा विश्वविक्रम मोडला.
वर्ग F४२ हा त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या एका पायाच्या हालचालीवर मध्यम परिणाम होतो. ग्रांप्री स्पर्धेत महेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. त्याने २३ मे रोजी ५.५९ मीटरच्या प्रयत्नाने लांब उडीच्या T42 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. दोन वेळा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि जागतिक विक्रमधारक सुमित अँटिलने भालाफेक F64 प्रकारात 72.35 मीटरसह अव्वल स्थान पटकावले. हा वर्ग अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या एका किंवा दोन्ही पायात हलकी हालचाल होत नाही किंवा अजिबात हालचाल होत नाही.
🇮🇳India’s Mahendra Gurjar sets a new World Record at the Nottwil World Para Athletics Grand Prix! 🔥🔥
The 27 y/o threw 61.17m, which is a new WR in the F42 category. pic.twitter.com/eva1H7C4TA
— The Bridge (@the_bridge_in) May 26, 2025
दोन वेळा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि विश्वविक्रमधारक सुमित अतिलने पुरुषांच्या भालाफेक F64 प्रकारात ७२.३५ मीटरच्या प्रयत्नासह पहिले स्थान पटकावले. F64 या कॅटेगिरीमध्ये अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या एका किंवा दोन्ही पायामध्ये हलकी हालचाल होत नाही किंवा अजिबात हालचाल होत नाही.
महेंद्रने F40, F57, F63 आणि F64 मध्ये पॅरा खेळाडूंसह एकत्रित स्पर्धेत भाग घेतला. महेंद्रचे प्रशिक्षक समरजीत सिंग मल्ही यांनी स्वित्झर्लंडहून पीटीआयला सांगितले की, “ही एक संयुक्त स्पर्धा होती ज्यामध्ये इतर श्रेणीतील पॅरा खेळाडूंनीही भाग घेतला होता. महेंद्रने F42 मध्ये सुवर्णपदक जिंकले आणि त्याच श्रेणीत विश्वविक्रमही केला. ते म्हणाले, ‘विविध श्रेणीतील पॅरा खेळाडूंनी एकत्रित स्पर्धेत भाग घेणे सामान्य आहे.’
ग्रांप्री स्पर्धेत महेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. २३ मे रोजी झालेल्या लांब उडी T42 स्पर्धेत त्याने ५.५९ मीटरच्या प्रयत्नाने पोडियमवर अव्वल स्थान पटकावले. मल्ही म्हणाला, ‘भालाफेक व्यतिरिक्त, आम्ही लांब उडी देखील सुरू केली आहे. ही महेंद्रची लांब उडी T42 मधील पहिलीच स्पर्धा आहे आणि या सुवर्णपदकानंतर तो आशियातील नंबर वन खेळाडू बनेल.