फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिका : भारताच्या संघाने सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात कांगारूंना त्याच्या घरच्या मैदानावर २९५ धावांनी पराभूत केलं आहे. टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024-25 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरली होती, मात्र आता पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड टेस्ट फायनलच्या या मोसमात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. याशिवाय गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. पर्थमधील ऑप्टस येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटी सामन्यानंतर, भारत ६१.११ च्या विजयाच्या टक्केवारीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ ५७.५९ च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. श्रीलंकेचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांची या चक्रातील विजयाची टक्केवारी ५५.५६ आहे, तर न्यूझीलंडचा संघ ५४.५५ टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या स्थानावर असून तो न्यूझीलंडपेक्षाही मागे नाही. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी ५४.१७ आहे. इंग्लंडचा संघ ४०.७९ टक्के विजयासह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी केवळ ३३.३३ आहे. इंग्लंड २७.५० विजयाच्या टक्केवारीसह ८ व्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज १८.५२ टक्के विजयाच्या टक्केवारीसह शेवटच्या म्हणजे ९व्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ सायकलनंतर पॉइंट टेबलमध्ये शीर्षस्थानी असणारे दोन संघ त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. ते जून २०२५ मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. सध्या भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका तसेच न्यूझीलंडचा संघ शर्यतीत आहे. मात्र, सध्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरी गाठण्याची अधिक शक्यता आहे.
1⃣ India are back at the top of the #WTC25 table
2⃣ New Zealand could move to second (58.33%) with a win this week in Christchurch 👀#AUSvIND #INDvAUS pic.twitter.com/KxDn1xQVNu— 🏏Flashscore Cricket (@FlashCric) November 25, 2024
भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्वाची आहे. भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी चार सामन्यांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना ६ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा मुख्य कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळवला जाईल. त्यामुळे भारताच्या संघामध्ये काही बदल होणे अपेक्षित आहे. हा सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.