फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना आज संपला आहे. यामध्ये भारताच्या संघाने सुरुवात खराब केली पण त्यानंतर भारताच्या संघाने गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आणि भारताच्या संघाने खेळ बदलला. भारताच्या संघाने पहिल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी पराभूत केलं आहे. या विजयासह बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या विजयाचे श्रेय हे जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जैस्वाल यांनी सर्वाधिक योगदान दिले आहे. तरी त्यांच्याशिवाय आणखी काही खेळाडूंनी भारतीय संघासाठी महत्वाची कामगिरी केली आहे.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पर्थ कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. याआधी या मैदानावर कांगारूंनी चार सामने खेळले होते आणि सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकले होते. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, ज्यासमोर संपूर्ण संघ केवळ 238 धावांवर गडगडला. गोलंदाजीत भारताचा नायक जसप्रीत बुमराह होता, ज्याने पहिल्या डावात गोलंदाजीची सलामी दिली आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेतले.
𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗪𝗜𝗡! 👏 👏
A dominating performance by #TeamIndia to seal a 295-run victory in Perth to take a 1-0 lead in the series! 💪 💪
This is India’s biggest Test win (by runs) in Australia. 🔝
Scorecard ▶️ https://t.co/gTqS3UPruo#AUSvIND pic.twitter.com/Kx0Hv79dOU
— BCCI (@BCCI) November 25, 2024
भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया १५० धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी त्यांची कमाल दाखवली आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या इनिंगमध्ये १०४ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवून टीम इंडियाने सामन्यात आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली. यशस्वी जयस्वालने दुसऱ्या इनिंगमध्ये १६१ धावांची खेळी खेळली तर केएल राहुलने संघासाठी ७७ धावांची महत्वाची खेळी खेळली आणि दोन दिवस ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा घाम गाळला. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने त्याचे करिअरचे ३० वे कसोटी शतक ठोकले. देवदत्त पडीक्कलने संघासाठी २५ धावांची खेळी खेळली. तर वॉशिंग्टन सुंदरने संघासाठी २९ धावा केल्या. नितीश कुमार रेड्डीने संघासाठी ३८ धावा केल्या आहेत.
भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताच्या संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले आहेत. वॉशिंग्टन सुंदरने २ विकेट्स नावावर केले आहेत तर हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतला आहे.
भारताच्या पहिल्या इनिंगच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट्स नावावर केले. हर्षित राणाने ३ विकेट्स नावावर केले. तर मोहम्मद सिराजने २ विकेट्स नावावर केले आहेत.