वीरेंद्र सेहवाग(फोटो-सोशल मीडिया)
India pak war : भारत आणि पाकिस्तानमधील सद्याची परिस्थिति तणाव वाढवणारी आहे. गेल्या शनिवारी संध्याकाळी ६ वाजता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा करार करण्यात आला. सुमारे तीन तासांनंतरच, पाकिस्तानकडून आपले खरे दात दाखवायला पुन्हा सुरू केले. पाकने पुन्हा एकदा सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानची घबराट समोर आल्याचे सर्वांनी पाहिले आहे.
पाकिस्तानच्या या कृतीवर देशात संतापाची लाट दिसून आली. माजी स्फोटक भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग देखील पाकिस्तानला आरसा दाखवला कमी कली नाही. ११ मे रोजी वीरेंद्र सेहवागने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सेहवागकडून भारतीय सैन्याचे कौतुक करण्यात आले. याशिवाय, त्याने पीओकेमध्ये भारतीय सैन्याच्या यशस्वी कारवाईचे फोटो देखील शेअर केले आहेत.
हेही वाचा : IPL 2020 : Josh Hazlewood चा आयपीएलला राम राम! दुखापततीमुळे खेळाडू संघाबाहेर
भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले आहे. या काळात लष्कराने पाकिस्तानचे अनेक महत्त्वाचे हवाई तळ लक्ष उद्ध्वस्त केले आहेत. फोटो शेअर करत वीरेंद्र सेहवागने इंस्टाग्रामवर लिहिले की, आपल्या सशस्त्र दलांकडून एक अद्भुत ब्रीफिंग मिळाली आहे. लक्ष्य अगदी लक्ष्यावरच मारण्यात आले आहे. आम्हाला आमच्या भारतीय सैनिकांचा अभिमान आहे. असे देखील सेहवागने लिहिले आहे.
वीरेंद्र सेहवागकडून काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यात भारतीय सैन्याने हल्ला करण्यापूर्वी आणि नंतर पाकिस्तानी हवाई तळाचे काही फोटो आहेत. सेहवागने शेअर केलेले फोटो पाकिस्तानमधील सरगोधा, सुक्कूर, चुनियान, रहिमयार खान, चकलाला, जेकोबाबाद आणि भोलारी येथील एअरबेसचे आहेत. भारतीय लष्कराने केलेल्या जोरदार हल्ल्यात हे हवाई तळ नष्ट झाले आहेत.
What a wonderful briefing by our armed forces, explaining how beautifully with precision the desired objectives were achieved.
Super proud of our armed forces. pic.twitter.com/L8XjAirCrJ— Virrender Sehwag (@virendersehwag) May 11, 2025
हेही वाचा : सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी कुठे आहे? टी-शर्टवर लिहिला एक खास संदेश लिहिला; विमानाचा Video Viral
सेहवाग पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्यास कधीच मागे पुढे बघत नसतो. तो रोखठोक बोलण्यात सर्वात पुढे असतो. तो अधूनमधून पाकिस्तानकडे आरसा दाखवत असतो. याआधी देखील, १० मे रोजी, सेहवागने पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावर टीका केली होती.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पार पडलेल्या ट्राय सिरीजच्या फायनलमध्ये भारताने कमालीचा खेळ दाखवत श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने श्रीलंकेला घरचा मैदानावर ९७ धावांनी पराभूत केले आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच भारताच्या संघाचा दबदबा दिसून आला. कालच्या सामन्यांमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत सात विकेट गमावून ३४२ धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात श्रीलंका २४५ धावांतच गारद झाली.