फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचव्या कसोटीचा पहिल्या दिनाचा अहवाल : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५ सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली जात आहे. रोहित शर्माच्या बाहेर बसण्याच्या निर्णयामुळे जसप्रीत बुमराह टॉससाठी आला होता. त्यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेली टीम इंडिया १८५ धावांत गारद झाली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियानेही ९ धावांत १ गडी गमावला होता. उस्मान ख्वाजाच्या विकेटपूर्वी जसप्रीत बुमराह आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात जोरदार वादावादी झाली, ज्याचे परिणाम ख्वाजाला शेवटच्या चेंडूवर विकेट गमावून भोगावे लागले.
IND vs AUS : सॅम कॉन्स्टास दिलेलं चॅलेंज जसप्रीत बुमराहने स्वीकारलं अन् पुढच्याच चेंडूला…
याआधी भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने चार, मिचेल स्टार्कने तीन आणि पॅट कमिन्सने दोन गडी बाद केले. भारतीय डावादरम्यान वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून गदारोळ झाला. स्निको मीटरने पुन्हा एकदा टीम इंडियाचा विश्वासघात केला, सुंदरची बॅट आणि ग्लोव्हज स्निको मीटरवर नसतानाही हालचाल झाली आणि तिसऱ्या पंचाने त्याला आऊट दिले. पुल शॉटचा प्रयत्न करताना पंत पुन्हा एकदा बाद झाला. विराट कोहलीची अवस्थाही अशीच होती, तो या मालिकेत ७व्यांदा स्लिपमध्ये झेलबाद झाला.
Innings Break!#TeamIndia post 185 in the 1st innings at the Sydney Cricket Ground.
Over to our bowlers.
Live – https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/1585njVwsn
— BCCI (@BCCI) January 3, 2025
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सतत खराब अंपायरिंग पाहायला मिळत आहे. असेच काहीसे सिडनीत खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. यामुळे थर्ड अंपायर जोएल विल्सन यांना पुन्हा एकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिला निर्णय भारतीय फलंदाज विराट कोहलीच्या बाजूने गेला, पण नंतर पंच सैकत शराफुद्दौला यांनी मैदानावरील निर्णयाचे पुनरावलोकन केल्यानंतर जोएल विल्सनने वॉशिंग्टन सुंदरला झेलबाद घोषित केले. हा निर्णय घेण्यासाठी विल्सनला बराच वेळ लागला. रिप्लेमध्ये सुंदरचा बाद होणे संशयास्पद वाटले, जरी स्निकोमीटरने चेंडू ग्लोव्हजच्या जवळ असताना स्पाइक दर्शविला, ज्यामुळे तो बाद झाला.
JASPRIT BUMRAH IS NOT HAPPY WITH WASHINGTON SUNDAR DECISION:
– Bumrah saying “Last game he didn’t give it out on snicko and now this give out”.pic.twitter.com/TNl69lFcY5
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 3, 2025
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा शेवटचा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. भारताचा संघ अजूनही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी गरजेचे आहे. या शर्यतीत सध्या सध्या दुसऱ्या स्थानासाठी दोन संघ आहेत. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाना WTC फायनलमध्ये जाण्यासाठी संधी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने WTC फायनलमध्ये जागा पक्की केली आहे.