फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा टी20 संघ एकिकडे आशिया कप खेळत आहे तर दुसरीकडे श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे भारतीय अ संघाचे सामने ऑस्टेलिया अ संघाशी सुरु आहेत. यामध्ये भारताच्या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे तर टीम इंडियाचा उपकर्णधार ध्रुव जुरेल आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचा तिसरा दिवस आता संपला आहे. या दिवशी पूर्णपणे भारतीय फलंदाजांचे वर्चस्व होते.
कर्णधार श्रेयस अय्यर वगळता, सर्व फलंदाजांनी अपवादात्मक कामगिरी केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला भारताची धावसंख्या ४०३/४ होती. भारत अ संघ अजूनही १२९ धावांनी पिछाडीवर आहे. देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल नाबाद राहिले. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी भारत अ संघाची धावसंख्या ११६/१ होती. अभिमन्यू ईश्वरन ४४ धावा करत नाबाद होता. नारायण जगदीसन ५०* आणि साई सुदर्शन २०* धावांवर नाबाद होता. पावसामुळे तिसऱ्या दिवसाची सुरुवात उशिरा झाली.
तिसऱ्या दिवशी जगदीसनच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. तो फारसे योगदान देऊ शकला नाही आणि ११३ चेंडूत ६४ धावा करत झेलबाद झाला. त्याने डावात ७ चौकार आणि १ षटकारही मारला. तिसऱ्या दिवशी साई सुदर्शनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने १२४ चेंडूंचा सामना केला आणि १० चौकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या. त्याला कूपर कॉनोलीने एलबीडब्ल्यू बाद केले. ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली नाही.
Stumps Day 3: India A – 403/4 in 102.6 overs (Dhruv Chand Jurel 113 off 132, Devdutt Padikkal 86 off 178) #IndAvAUS #IndiaASeries
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 18, 2025
भारतीय कर्णधाराने १३ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ८ धावा केल्या. कोरी रोचिओलीने अय्यरला एलबीडब्ल्यू बाद केले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांनी १८१ धावांची भागीदारी कायम ठेवली. यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल १३२ चेंडूत ११३ धावांवर नाबाद राहिला. पडिक्कल १७८ चेंडूत ८६* धावांवर नाबाद राहिला. सामना अनिर्णित राहण्याची शक्यता होती.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन कसोटी सामने तर ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारताच्या संघाच्या पहिल्या सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे हा सामना झाल्यानंतर दुसरा सामना हा 30 सप्टेंबर रोजी दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.