Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघात बदल होण्याची शक्यता

अश्विन आणि सुंदरपैकी एकाला विश्वचषकाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा देखील संघात आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 19, 2023 | 08:21 AM
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघात बदल होण्याची शक्यता
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया : वर्ल्ड कप आधी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन वनडे मालिका खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. संघाची कमान केएल राहुलच्या हाती असेल. आर अश्विनचे ​​संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या संघात परतणार आहेत. वर्ल्ड कप सारख्या मोठी स्पर्धा पाहता बीसीसीआयने पहिल्या दोन एकदिवसीय सामान्यांमधून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर वर्ल्ड कप मध्ये सुद्धा भारताच्या संघामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे निवडकर्त्यांना बदलीचा विचार करावा लागणार आहे. आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना तिन्ही एकदिवसीय सामन्यांसाठी संघात ठेवण्यात आले आहे. अश्विन आणि सुंदरपैकी एकाला विश्वचषकाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा देखील संघात आहेत. मात्र हे तिन्ही खेळाडू तिसऱ्या वनडेत संघासोबत नसतील. मात्र, संजू सॅमसनची एकाही सामन्यासाठी निवड झालेली नाही. यावरून संजू सॅमसनसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या दोन वनडेसाठी संघ: केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा , प्रसिध कृष्णा, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या वनडेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

Web Title: India vs australia indian cricket team rohit sharma virat kohli r ashwin k l rahul bcci hardik pandya akshar patel shubhman gill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2023 | 08:21 AM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • india
  • India Vs Australia
  • indian cricket team
  • k l rahul
  • R Ashwin
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
2

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
3

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

IND vs SL: गॉलमध्ये तिरंगा फडकला, राष्ट्रगीत घुमलं; 600व्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा खास अंदाज
4

IND vs SL: गॉलमध्ये तिरंगा फडकला, राष्ट्रगीत घुमलं; 600व्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा खास अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.