भारत विरुद्ध बांग्लादेश : आज भारताचा संघ बांग्लादेश सोबत भिडणार आहे. काल पार पडलेला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यामध्ये श्रीलंकेचा संघ विजय मिळवून अंतिम फेरीच्या धडक मारली आहे. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेच्या सामन्यातील स्थान अगोदरच निश्चित करणाऱ्या भारताचा आज आव्हान संपुष्टात आलेल्या बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. आजचा सामना भारताच्या संघासाठी फायनलच्या तयारीचा असणार आहे. तरी विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज राखीव खेळाडूंना संधी मिळू शकते.आतापर्ययत भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये ४० एकदिवसीय सामने झाले आहेत.
त्यामध्ये आतापर्यत बांग्लादेशच्या संघाने सात सामने जिंकले आहेत तर दोन सामान्यांचा निकाल लागला नाही. ३१ सामने भारताच्या संघाने जिंकले आहे त्यामुळे आतापर्यत भारताच्या संघांचे पारडे जड दिसत आहे. परंतु २००७ मधील एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला बांग्लादेशने पराभूत केले होते. तेव्हापासून बांग्लादेशचा संघ भारताच्या संघाला पराभूत करू शकतो याच हेतूने मैदानात उतरतो. आजचा हा सामना कोलंबोमध्ये भारताच्या वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्या पसंतीच्या संघाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा की पुढच्या महिन्यामध्ये भारताचमध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी आपल्या काही संभाव्य खेळाडूंना संधी द्यायची याचा सखोल विचार केला जाईल.
आशिया चषकासाठी दोन्ही संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा.
बांग्लादेश संघ : शकिब अल हसन (कर्णधार), अनामूल हक बिजॉय, नजमुह हुसेन शांतो, तौहीद हृदय, अफिफ हुसैन ध्रुबो, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक मेहदी हसन, नईम शेख , शमीम हुसेन, तनजीद हसन तमीम, तनजीद हसन साकिब.