बीड: पती पत्नीच्यामधात वाद होतंच असतात त्याला विसरून पती पत्नी आपलं संसार सुरळीत करता. अनेकदा वादामुळे संसार टिकत नाही. हा वाद विकोपाला गेला की घटस्फोट, हत्या किंवा आत्महत्या अशे प्रकार घडतात. आता बीडच्या गेवराई तालुक्यातून एक अतिशय धक्कदायक बातमी समोर आली आहे. पती- पत्नीच्या वादात आईने दोन वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून स्वतः आत्महत्या केली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील मालेगाव मजरा या गावात उघडकीस आली असून मायलेकींच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी; दोघांना अटक
दोघांचा दुसरा विवाह
मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता यांचे तीन वर्षांपूर्वी मालेगाव येथील बळीराम यांच्याशी विवाह झाला. मात्र सतत पती- पत्नीत होणाऱ्या वादामुळे त्या त्रस्त होत्या. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून अंकिताने आत्महत्येच पाऊल उचलत आपलं जीवन संपवलंय. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. या वादात मात्र एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बळीराम आणि अंकिता या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. दरम्यान या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून काही घातपात आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.
राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू
नदी नाल्याला पूर आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. परळी तालुक्यातील कवडगाव हुडा येथील रस्त्यावरील नदीपात्रात काल रात्री एक कार वाहून गेली. या कारमध्ये चार जण होते,त्यापैकी तिघांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून एकाच मृत्यू झाला आहे. तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हासनाल गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.
परळी हुडा कौडगाव येथील पुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने फॉर व्हीलर गाडी पुलावरून नदीच्या पात्रात वाहून गेली. रात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की दिग्रस येथील काही तरुण गाडीमधून जात असतांना कवडगाव हुडा येथे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत. पाण्याचा अंदाज नसतानाही पोहण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे पोलिस मार्ग काढत रिक्षा घेऊन पाण्यात उतरले. दोर वापरून युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापर्यंत दोर पोहोचत नव्हता, त्यामुळे पाण्यामध्ये जाऊन पोलिसांनी स्वत:च्या आणि त्या युवकाच्या कंबरेला दोर बांधून त्याला रात्रीच्या अंधारात बाहेर काढले. तिघा तरुणांना वाचवण्यत यश आले.