फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान दुसऱ्या दिनी हवामान : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिनाला आता काही वेळात सुरुवात होणार आहे. काही दिवसभर ऊन असल्यामुळे खेळ चांगला चालला त्याचबरोबर फलंदाजांना मदत झाली. आज दुसऱ्या दिनी शुभमन गिल आणि ऋषभ पंत हे दोघेही फलंदाजी करताना दिसणार आहेत. दोन्हीही फलंदाजांनी काल चांगली कामगिरी केली आहे, कर्णधाराने शतक झळकावले होते तर उपकर्णधाराने अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याच्या या कामगिरीवर चाहत्याचे लक्ष लागून आहे.
लीड्समध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे इंग्लडच्या हवामानाचा अंदाज लावणे फार कठीण असते कधी तिकडे पाऊस पडेल आणि कधी ऊन ही सांगणे देखील कठीण आहे. आजचा दुसऱ्या दिनी कसोटी सामन्यात पाऊस हजेरी लावणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आज भारत विरुद्ध इंग्लंड या दुसऱ्या दिनी सामना दरम्यान हवामान कसे असणार आहे या संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
हेडिंग्ले कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता जास्त आहे. दिवसभर मैदानावर काळे ढग राहणार आहेत. सकाळी आणि दुपारी पावसाची शक्यता जास्त आहे. तथापि, पावसामुळे खेळाच्या सुरुवातीला कोणताही अडथळा येणार नाही. परंतु फलंदाजांसाठी चिंतेची बाब म्हणजे ढगाळ वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळेल. या परिस्थितीत फलंदाजी करणे खूप कठीण होईल. AccuWeather च्या मते, दिवसाच्या शेवटच्या सत्रात पावसाची शक्यता सुमारे ८८ टक्के आहे.
Rain likely to interrupt Day 2 between England and India in Leeds. pic.twitter.com/F3DWDOUHup — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 21, 2025
लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावा जोडल्या. राहुलने 42 धावा केल्या तर यशस्वीने 101 धावांची शानदार खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला साई सुदर्शन खराब कामगिरी करत खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर शुभमन गिल आणि यशस्वीने जबाबदारी सांभाळली आणि तिसऱ्या विकेटसाठी 129 धावा जोडल्या.
गिल-यशस्वीच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे टीम इंडियाने दुसऱ्या सत्रात एकही विकेट गमावली नाही. यशस्वी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर गिल आणि ऋषभ पंत यांनी जलद शैलीत फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी 138 धावा जोडल्या आहेत. गिल 127 धावांसह आणि पंत 65 धावांसह क्रीजवर आहेत.






