IND vs OMA (Photo Credit- X)
IND vs OMA, Asia Cup 2025: आज आशिया कप २०२५ मधील शेवटच्या लीग सामन्यात भारतीय संघ ओमान सोबत भिडत आहे. हा सामना अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ओमानसमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
A big total for India against an inexperienced Oman side 💪#INDvOMA LIVE ▶️ https://t.co/AMBIZU5uoM pic.twitter.com/j7d3xAGpS5
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 19, 2025
या रोमांचक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली, कारण सलामीवीर शुभमन गिल अवघ्या ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी संघाला सावरले. यामध्ये संजू सॅमसनने सर्वाधिक ५६ धावांची शानदार खेळी केली. त्याने ४५ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. संजू सॅमसनशिवाय अभिषेक शर्माने ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
ओमानच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. शाह फैसलने शुभमन गिलला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. ओमानकडून जितेन रामानंदी, शाह फैसल आणि आमिर कलीम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. विजयासाठी ओमानला २० षटकांत १८९ धावांची गरज आहे.
आजच्या ओमानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एक मोठा पराक्रम करत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५० सामने पूर्ण केले आहेत. भारतीय संघ ही ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातील दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी केवळ पाकिस्तानने २५० पेक्षा जास्त टी-२० सामने खेळले आहेत. २००६ मध्ये आपला पहिला टी-२० सामना खेळणाऱ्या टीम इंडियाने आतापर्यंत २५० सामने खेळले आहेत. यातील १६६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर ७१ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. सहा सामने बरोबरीत (टाय) सुटले आहेत, तर सहा सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. भारत हा जगातील एकमेव असा संघ आहे, ज्याचा टी-२० मध्ये आतापर्यंत ज्या संघांविरुद्ध सामना झाला आहे, त्या प्रत्येक संघाविरुद्ध त्याचा विजय दर (Win Percentage) ५०% पेक्षा जास्त आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
ओमान (प्लेइंग इलेव्हन): आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), शाह फैसल, जिक्रिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव, जितेन रामानंदी