IND vs OMA (Photo Credit- X)
IND vs OMA, Asia Cup 2025: आज आशिया कप २०२५ मधील शेवटच्या लीग सामन्यात भारतीय संघ ओमान सोबत भिडणार आहे. हा सामना अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने प्लेइंग ११ मध्ये वरुण चक्रवर्ती आणि बुमराहला आराम दिला आहे. तर, अर्शदीप आणि हर्षित राणाला सघांत दाखल केलं आहे.
Asia Cup 2025. India won the toss and elected to Bat. https://t.co/f821Q2KeZt #INDvOMA #AsiaCup2025
— BCCI (@BCCI) September 19, 2025
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
ओमान (प्लेइंग इलेव्हन): आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), शाह फैसल, जिक्रिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव, जितेन रामानंदी
Sunil Gavaskar: सुनिल गावस्करचा ‘सूर्य’ला खास सल्ला; ‘संजू-तिलकचा बॅटिंग ऑर्डर बदला, अन् बुमराहला…’
ओमानविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी खूप खास आहे, कारण हा भारताचा २५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा भारतीय संघ पाकिस्ताननंतर दुसरा संघ ठरला, ज्यांनी आतापर्यंत २७५ सामने खेळले आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या २५० सामन्यांपैकी १६६ सामन्यांत विजय मिळवला असून, ७१ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अबु धाबीच्या स्टेडियमवरील भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिला तर, त्यांनी या मैदानावर फक्त एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे, जो २०२१ च्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तानविरुद्धचा होता. त्या सामन्यात भारताने २ बाद २१० धावा केल्या होत्या आणि अफगाणिस्तानला १४४ धावांवर रोखत ६६ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे, या मैदानावर भारताचा विजयाचा रेकॉर्ड १०० टक्के आहे. दुसरीकडे, ओमानने येथे १३ सामने खेळले असून, ६ सामने जिंकले आणि ७ सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.