फोटो सौजन्य - स्टार स्पोर्ट्स
Women’s ODI World Cup 2025 India vs Pakistan : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 फारच मनोरंजक होत चालला आहे. आत्तापर्यंत भारताची संघाने दोन्ही सामन मध्ये कमालीची कामगिरी केली आहे आणि या दोन्ही सामन्यांमध्ये विशेष कौतुक हे भारतीय गोलंदाजांचे असणार आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ही तिचा रागीट स्वभावामुळे त्याचबरोबर तिच्या खेळीमुळे ओळखली जाते. काल पाकिस्तान विरुद्ध भारतीय महिला संघाचा सामना खेळवण्यात आला या सामन्यात वाद होणार नाही असे फार कमी वेळा झाले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये पाकिस्तानची गोलंदाज नशरा संधू ही भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्याकडे रागात पाहत असताना तिच्याच भाषेत हरमनने तिला उत्तर दिले आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये ५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची गोलंदाज नशरा संधू यांच्यात एक छोटीशी बाचाबाची झाली, ज्याला भारतीय कर्णधाराने तिच्याच शैलीत उत्तर दिले. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
🙂↔️💉 pic.twitter.com/9vqCC0zEhv — Unsung Captain 👑 (@_harrykaur7_) October 5, 2025
खरंतर, पाकिस्तानकडून डावातील २२ वे षटक नशरा संधूने टाकले. षटकातील शेवटचा चेंडू टाकल्यानंतर नशरा भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरकडे रागाने पाहत होती. हरमनप्रीतने सुरुवातीला पाकिस्तानी खेळाडूकडे पाहिले, नंतर नशराबद्दल टिप्पणी केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौरला बॅटने फारसे यश मिळवता आले नाही. पाकिस्तानविरुद्ध तिने ३४ चेंडूत फक्त १९ धावा काढल्या.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकांत २४७ धावा केल्या. टीम इंडियाकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. रिचा घोषनेही ३५ आणि जेमिमाने ३२ धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना डायना बेगने सर्वाधिक विकेट्स घेतल्या, १० षटकांत ६९ धावा दिल्या.
त्यानंतर पाकिस्तानचा संघ ४३ षटकांत १५९ धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने सर्वाधिक ८१ धावा केल्या, परंतु ती आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. नतालिया परवेझनेही ३३ धावा केल्या. टीम इंडियाकडून क्रांती गौर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.