मनदीप सिंग आणि उदिता कौर(फोटो-सोशल मिडिया)
Indian Hockey : भारतीय हॉकी संघाच्या दोन खेळाडू आज 21 मार्च रोजी विवाहबद्ध झाले आहेत. जालंधरचा ऑलिम्पिक पदक विजेता स्टार खेळाडू मनदीप सिंग आणि भारतीय महिला संघाची हॉकीपटू उदिता कौर यांनी आज लग्न केले आहे. भारतीय महिला संघात उदिता कौर बचावपटू म्हणून खेळते. या दोघांनी सात फेरे घेताच ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले आहेत. मनदीप सिंग आणि उदिता कौर यांनी जालंधरच्या मॉडेल टाऊनमध्ये गुरुद्वारा सिंग सभेच्या सात फेऱ्या मारल्या.
या विवाह सोहळ्यात सरचिटणीस भोला सिंगसह भारतीय हॉकी संघाचा संपूर्ण संघ हजर होता. मनदीपच्या आईने सांगितले की, आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे. या लग्नामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक दोघांमध्येही आनंदाचे वातावरण होते. तसेच मनदीपच्या आईने उदिताला सून नव्हे तर मुलगी म्हणून ठेवणार असल्याचे सांगितलेअ आहे.
माध्यमांसोबत बोलताना उदिता म्हणाली की, आम्ही दोघेही भारतीय संघाकडून खेळतो. 2018 मध्ये आशिया क्रीडा स्पर्धेदरम्यान आम्हा दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि आज लग्न झाले. कोरोनाच्या काळात दोघांचे नाते अधिक घट्ट होत गेले. यादरम्यान दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले.
मनदीप आणि उदिता दोघेही कुटुंब आणि बाहेरच्या जगापासून दूर एकाच कॅम्पमध्ये अडकून होते. जिथे त्यांनी एकत्र जास्त वेळ घालवायला सुरुवात केली आणि एकमेकांच्या कंपनीत त्यांना सर्वात जास्त आराम मिळत असे. साथीच्या आजाराच्या एकाकी काळामध्ये एकमेकांना बोलण्यात आणि पाठिंबा देण्यात बराच वेळ घालवला. त्यामुळे ते अधिक जवळ आले. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तसतसे ते जास्त जवळ येत गेले. मैत्री म्हणून जे सुरु झाले ते प्रेमात परिवर्तीत झाले. आता काही वर्षांनंतर दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत.
हेही वाचा: Chahal-Dhanashree Divorce : धनश्रीपासून घटस्फोटाने खचला चहल, मास्कआड लपवल्या अश्रूधारा; पहा Video…
यावेळी उदिता माध्यमांशी बोलताना म्हणाली की, भारतीय पुरुष संघाप्रमाणेच महिला संघ देखील हॉकीमध्ये पदक मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच मनदीप म्हणाला की, आजचा दिवस आनंदाचा आहे. आता हे दोघेही भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करून देशासाठी पदक जिंकून आणणार आहेत.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.