फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिनाचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काल म्हणजेच ३ जुलै रोजी दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने बाजी मारली. भारताच्या संघाने कालच्या दिनी फलंदाजी तर चांगली केलीच त्याचबरोबर जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत संघांमध्ये स्थान मिळालेला आकाशदीपने त्याची जादू दाखवली आणि दोन चेंडूमध्ये दोन विकेट्स नावावर केले. पहिल्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारूनही भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता त्याचे कारण म्हणजेच टीम इंडियाची कमकुवत गोलंदाजी.
या सामन्यात भारताच्या संघाने इंग्लंडविरुद्ध चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. भारताच्या संघाने तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लंडचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहेत. कालच्या दिनी भारताच्या संघाने फलंदाजीमध्ये १५२ ओव्हर खेळल्या आणि यामध्ये संघाने ५८७ धावा केल्या. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिल याने २६९ धावा केल्या आणि इतिहास रचला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी देखील भारतीय कर्णधाराला चांगली साथ दिली.
भारतीय संघासाठी दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस फार महत्वाचा असणार आहे. टीम इंडियाच्या हाती जर लवकर विकेट्स लागले तर सामना ड्रॉ होण्याऐवजी भारताच्या संघाच्या हाती मालिकेचा पहिला विजय हाती लागेल आणि मालिकेमध्ये १–१ अशी बरोबरी होईल. भारतीय संघाच्या पहिल्या डावामधील फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर भारताचा युवा फलंदांज याने या इनिंगमध्ये कमालीचा खेळ दाखवला आणि संघासाठी पहिल्याच डावामध्ये ८७ धावा केल्या. यामध्ये त्याने १३ चौकार मारले.
Stumps on Day 2 in Edgbaston! End of a tremendous day with the bat and ball for #TeamIndia 🙌 England 77/3 in the first innings, trail by 510 runs Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/GBKmE34pgM — BCCI (@BCCI) July 3, 2025
केएल राहुलने संघासाठी शतक मागील सामन्यात झळकावले होते पण या सामन्यात तो मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. शुभमन गिल याने त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात्तम धावसंख्या केली. त्याने दुसऱ्या दिनी दुसरे अर्धशतक झळकावत त्याने 269 धावा केल्या, यामध्ये त्याने 3 षटकार आणि 30 चौकार मारले. त्याचबरोबर रविद्रं जडेजा याने देखील संघासाठी चांगली कामगिरी केली आणि त्याने 89 धावांची खेळी खेळली आणि भारताच्या मोठ्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. वाॅशिंगटन सुंदर याने देखील कमालीचा खेळ दाखवला त्याने संघासाठी 42 धावा केल्या.






