हार्दिक पंड्या आणि कृनाल पंड्या(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आह. आतापर्यंत ६५ सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान या स्पर्धेत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. अनेक छोटे मोठे विक्रम वेगवेगळ्या सामन्यात झालेले दिसून आले आहेत. आयपीएल २०२५ मधील लीग स्टेज सामने आता काही पूर्ण होणार आहेत. पण याआधीही दोन दिवसांत दोन मोठे विक्रम या स्पर्धेत नोंदवले गेले आहेत. आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
प्रथम आयपीएलमध्ये मार्श बंधूंनी म्हणजेच शॉन मार्श आणि मिशेल मार्श यांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारे ते पहिले दोन भाऊ ठरले आहेत. २००८ च्या हंगामात, शॉन मार्शने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना ६९ चेंडूत ११५ धावांची खेळी केली होती. तर गुरुवारी म्हणजेच २२ मे रोजी लखनौ सुपर जायंट्सकडून मिचेल मार्शने ६४ चेंडूत ११७ धावा केल्या आहेत. दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ मे रोजी पंड्या बंधूं यांनी देखील एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.
शुक्रवार रोजी (२३ मे) लखनौमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेवळवण्यात आला. यादरम्यान, प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २३२ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल, बेंगळुरूने चांगली सुरुवात केली खरी पण शेवटी संघाला पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या २६ चेंडूत संघाने फक्त १६ धावा केल्या आणि ७ विकेट देखील गमवाव्या लागल्या होत्या. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्या १९ व्या षटकात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने ५ चेंडूत ८ धावा केल्या होत्या. त्याने पॅट कमिन्सच्या यॉर्कर चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू मारण्याऐवजी तो ऑफ स्टंपला आदळला. अशा अनोख्या प्रकारे कृणाल हिट विकेट झाला आणि पॅव्हेलियनमध्ये माघारी परतला. त्याने ६ चेंडूत ८ धावा केल्या होत्या.
यापूर्वी, त्याचा भाऊ हार्दिक २०२० च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अशाच प्रकारे बाद झाला होता. तो आंद्रे रसेलविरुद्धच्या क्रीजच्या आत गेला आणि तिसऱ्या माणसाकडे खेळण्याचा प्रयत्नात त्याचा पाय स्टंपला लागून तो हिट विकेट झाला. अशा पद्धतीने, पंड्या बंधू आयपीएलमध्ये हिट विकेट आउट होणारी पहिली दोन भावांची जोडी बनली आहे.
आयपीएल २०२५ मध्ये हिट विकेटने बाद होणारा कृणाल पांड्या हा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अभिनव मनोहरही अशाच प्रकारे माघारी परतला होता. या दोघांपूर्वी या लीगमध्ये १५ खेळाडू हिट विकेट झाले आहेत. याचा अर्थ असा की कृणाल हा अशा प्रकारे बळी पडलेला १७ वा खेळाडू ठरला आहे.