फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Wanindu Hasaranga took four wickets in the RR vs CSK match : कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने ११ व्या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून हंगाम-१८ मधील पहिला विजय नोंदवला, तर चेन्नईच्या संघाला सलग सीझनचा दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात राजस्थान रॉयलच्या गोलंदाजांनी कमालीचा खेळ दाखवला. तर नितीश राणाने संघासाठी कमालीची फलंदाजी देखील केली आहे. रॉयल्सची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उत्कृष्ट होती. पहिल्या डावात नितीश राणाने सीएसकेच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले.
याच सामन्यादरम्यान तत्कालीन फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने गोलंदाजीत सीएसकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले, परंतु तरीही हसरंगाला सामनावीराचा पुरस्कार जिंकता आला नाही. या सामन्यात, राजस्थान रॉयल्सकडून वानिंदू हसरंगाने अद्भुत गोलंदाजी सादर केली. गोलंदाजी करताना, हसरंगाने ४ षटकांत ३५ धावा देत ४ बळी घेतले. हसरंगाने राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि विजय शंकर यांचे बळी घेतले. तथापि, ४ विकेट घेऊनही हसरंगा सामनावीर बनू शकला नाही.
Wanindu Hasaranga appreciation post.
A phenomenal 4 wicket haul by the Sri Lankan, broke every partnership that CSK tried to build.
Absolute impact 🔥🔥 pic.twitter.com/b66fqf5MUG— Cricket Addictor (@AddictorCricket) March 30, 2025
गेल्या २ सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर, तिसऱ्या सामन्यात सीएसकेविरुद्ध नितीश राणाची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात राणाने चेन्नईच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. फलंदाजी करताना नितीशने फक्त ३६ चेंडूत ८१ धावा केल्या, ज्यात १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. नितीशला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
IPL 2025 : मोठी अपडेट! संघाच्या विजयानंतरही कर्णधार रियान परागला मोठा धक्का, 12 लाखांचे नुकसान
राजस्थान रॉयल्सने सामना ६ धावांनी जिंकला, हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याला प्रत्युत्तर म्हणून, सीएसकेचा संघ ६ विकेट गमावून केवळ १७६ धावा करू शकला. सीएसकेसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. याशिवाय रवींद्र जडेजा ३२ धावा करून नाबाद राहिला.
१७ वर्षांनी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आरसीबीकडून पराभव पत्करल्यानंतर गुवाहाटीला पोहोचलेल्या सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वालने पहिल्या चेंडूवर चौकार मारून सुरुवात केली पण तिसऱ्या चेंडूवर खलीलने त्याला पायचीत केले. यशस्वी बाद झाल्यानंतर आलेल्या नितीशने ओव्हरपिच चेंडूवर चौकार मारून आपले खाते उघडले आणि त्यानंतर तो थांबला नाही.