फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Riyan Parag fined Rs 12 lakh for slow over rate : काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सला ६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामान्यांच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२५ मध्ये पहिला विजय हाती लागला आहे. तर चेन्नई सुपर किंग्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रविवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यालाही स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. आता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे, यासंदर्भात सविस्तर वाचा.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. या रोमांचक सामन्यात राजस्थानने सहा धावांनी विजय मिळवला, पण संघाचा कर्णधार रायन परागच्या अडचणी वाढल्या आहेत. रियान परागवर लावण्यात आलेल्या दंडाबाबत बीसीसीआयने सांगितले आहे की, ‘आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत रियान परागच्या संघाचा या हंगामातील हा पहिलाच गुन्हा असल्याने, कर्णधाराला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.’
Reaction from Captain Riyan Parag after winning the match 😀👌 pic.twitter.com/DTrPqVHgcj
— Johns. (@CricCrazyJohns) March 30, 2025
आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याला स्लो ओव्हर रेटमुळे संघाला एक सामन्यात बॅन करण्यात आले होते. त्यानंतर तो आयपीएल २०२५ चा पहिल्या सामना खेळू शकला नाही. आयपीएल २०२४ मध्ये तीन सामन्यांमध्ये कर्णधाराने किंवा गोलंदाजाने गोलंदाजी करण्यात उशीर केलास त्याला पहिल्या दोन वेळी कर्णधाराला फाईन द्यावा जर ती चूक तीन वेळा केल्यास कर्णधाराला एक सामन्याचा एक सामन्याचा बॅन करणाराला लागतो. मागील सीझनमध्ये रिषभ पंतला देखील एक सामन्याचा बॅन लागला होता.