फोटो सौजन्य - Ireland Cricket सोशल मीडिया
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका : आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन T२० सामान्यांची मालिका पार पडली. यामध्ये पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आयर्लंडच्या संघाला पराभूत केलं होत. हा सामना दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या सामन्यात रायन रिकेल्टन आणि रीझा हेंड्रिक्स या दोघांनी मजबूत खेळी खेळली आणि १४ चेंडू शिल्लक असताना १७१ धावांचे लक्ष्य पूर्ण केल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे १-० अशी आघाडी होती. त्यामुळे आता या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये २९ सप्टेंबर रोजी दुसरा T२० सामना पार पडला आहे.
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या T२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यामध्ये पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत आयर्लंडच्या संघाने १९५ धावांचे लक्ष्य उभे केले होते. यामध्ये आयर्लंडचा फलंदाज रॉस अडायर याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा घाम गाळत शतक झळकावले. पॉल स्टर्लिंगने सुद्धा त्याचे अर्धशतक पूर्ण केलं. आयर्लंडच्या संघाने ६ विकेट्स गमावून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९५ धावांचे लक्ष्य उभे केले होते.
आयर्लंडच्या गोलंदाजाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी सुद्धा सामन्यात प्रेक्षकांना प्रभावित केलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आयर्लंडच्या गोलंदाजांनी ९ विकेट्स घेऊन १८५ धावांवर रोखलं. विआन मुल्डर याने दोन विकेट्स तर इतर खेळाडूंनी प्रत्येकी १-१ विकेट घेतला. अशाप्रकारे आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात आयर्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध पहिल्यांदा विजय मिळवला आहे.
WHAT A NIGHT.
Ireland win first-ever Men’s T20I against South Africa (and tie the series 1-1).
Match report 👉 https://t.co/8t3QAMVQpx#IREvSA #BackingGreen pic.twitter.com/VNlfxVYNTz
— Cricket Ireland (@cricketireland) September 29, 2024
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये २ सामान्यांची ही मालिका आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने नावावर केला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतरच्या कालच्या सामान्यत ऐतिहासिक विजय मिळवून आयर्लंडच्या संघाने या मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी केली आहे.