फोटो सौजन्य : Cricket Ireland
21 मे रोजी आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका सुरू झाली आहे. काल या मालिकेचा पहिला सामना पार पडला या सामन्यात आयर्लंड संघाने सर्वांना चकित केले आहे. कालच्या सामन्यामध्ये आयर्लंडचा कर्णधार पॉल स्त्रीलिंगी याच्या नेतृत्वात संघ मैदानात उतरला तर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई हॉप त्याचा कॅप्टन्सीमध्ये संघाने कालचा सामना खेळला. या सामन्यात वेस्टइंडीजच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोळंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या संघाने वेस्ट इंडिजचा 124 धावांनी पराभव केला आणि या विजयासह आयर्लंडच्या संघाने या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
█▓▒▒░░░Result░░░▒▒▓█
What a win, and what a way to start the series!
👀 WATCH: TNT Sport 2
📝 SCORECARD: https://t.co/9cwPX120LU
📰 SERIES GUIDE: https://t.co/SPlkobDWiG#BackingGreen #TokenFi @solar_failte ☘️🏏 pic.twitter.com/nHA0mUkmOX— Cricket Ireland (@cricketireland) May 21, 2025
कालच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. आयर्लंडच्या संघाने पहिल्या फलंदाजीचे आव्हान स्वीकारत अँड्र्यू बालबर्नी याने संघाला चकित केले आणि शतक ठोकले. त्याने कालच्या सामनामध्ये 138 चेंडूंमध्ये 112 धावा केल्या यामध्ये त्याने चार षटकार आणि नऊ चौकार मारले. कर्णधार कॉल स्त्रीलिंग याने संघासाठी अर्धशतक ठोकले. यात त्याने दोन षटकार आणि सहा चौकार मारले. वेस्टइंडीज विरुद्ध या दोघांच्या जोडीने संघाला कमालीची सुरुवात करून दिली आणि या दोघांच्या जोरावर आयर्लंडच्या संघाने सहा विकेट गमावून 50 ओव्हरमध्ये 303 धावा केल्या.
कॅड कार्मिचेल हा कालच्या सामन्यात काय विशेष कामगिरी करू शकला नाही त्यांनी 21 चेंडूंमध्ये 16 धावा केल्या. तर हरी ट्रॅक्टर याने संघासाठी अर्धशतक ठोकले आणि 51 चेंडू मध्ये 56 धावा केल्या. लोक्रकन टक्कर याने संघासाठी 30 महत्त्वाचे धावा केल्या.
आयर्लंडच्या गोलंदाजांनी कालचा सामन्यात कमालीची गोलंदाजी केली यामध्ये बॅरी मॅकार्थी या संघाला चार विकेट्स मिळवून दिले. कालच्या सामन्यात त्याने ब्रँडन किंग, किसी कार्टी, आमिर जागू आणि मॅथ्यू फोर्ड या चौघांना बाहेरचा रस्ता दाखवला.तर जॉर्ज डॉकरेल याने वेस्टइंडीज विरुद्ध फक्त दोन ओवरमध्ये तीन विकेट्स घेतले. यामध्ये त्याने जस्टिन ग्रीव्हज, रोस्टन चेस आणि गुडाकेश मोती या तिघांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. थॉमस आणि जासूवा लिटल या दोघांनी प्रत्येकी संघाला एक एक विकेट मिळवून दिली.