फोटो सौजन्य - Cricket Ireland सोशल मीडिया
आयर्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका : आयर्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका झाली आहे. यामध्ये आता क्रिकेट विश्वातील मोठा आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. आयर्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये काल मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना झाला. यामध्ये आयर्लंडच्या संघाने साऊथ आफ्रिकेचा ६९ धावांनी पराभव केला आहे. आयर्लंडच्या संघाने सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आयर्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत २८४ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजांचा आयर्लंडने घाम गाळला.
कर्णधार पॉल स्टर्लिंगने ९२ चेंडूत ८८ धावा केल्या. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँडी बालबर्नी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत आयर्लंडला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १४० चेंडूत १०१ धावा केल्या. फिरकीपटू ट्रिस्टन स्टब्सने दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. त्याने सलामीवीर अँडी बालबर्नीला २४व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लिझाड विल्यम्सकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बलबर्नीने ७३ चेंडूंचा सामना करत ४५ धावा केल्या.
बालबर्नी बाद झाल्यानंतर कर्णधार स्टर्लिंगनेही कर्टिस कॅम्परसोबत अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूत ५८ धावांची भागीदारी झाली. कॅम्परने ३६ चेंडूत ३४ धावा केल्या. कॅम्पर बाद झाल्यानंतर पॉल स्टर्लिंगही लवकर बाद झाला. त्याने ९२ चेंडूंचा सामना करत ८८ धावा केल्या.
WE WIN!!! 🥳
What a night in Abu Dhabi. We end our tour to the UAE on a winning note! 🙌
▪️ Ireland 284-9 (50 overs)
▪️ South Africa 215 (46.1 overs)#IREvSA #BackingGreen #MyMaster11 pic.twitter.com/aVW3oSGeMX— Cricket Ireland (@cricketireland) October 7, 2024
साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, संघाने कमालीची कामगिरी केली आहे. साऊथ आफ्रिकेचे पहिले तीन फलंदाज पहिल्या पाच ओव्हरमध्ये गेले आहेत. साऊथ आफ्रिकेचा फलंदाज जेसन स्मिथने ९३ चेंडूंमध्ये ९१ धावा केल्या काइल व्हेरेनेने ३६ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. परंतु दक्षिण आफ्रिकेचा संघ २१५ धावांवर सर्वबाद झाला आणि आयर्लंडने विजय मिळवला. परंतु ही मालिका २-१ ने दक्षिण आफ्रिकेने नावावर केली आहे.