फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४ ची सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयासह समाप्ती झाली. कांगारूंनी ही मालिका ३-१ अशी जिंकली. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात टीम इंडियाला नक्कीच यश आले होते, पण त्यानंतरच्या चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा दिसून आला. भारतीय फलंदाजीबरोबरच गोलंदाजीनेही निराशा केली, जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू आहे जो योद्धासारखा लढत राहिला. बुमराहने या मालिकेत चमकदार कामगिरी करत 32 विकेट घेतल्या, या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेल्या बुमराह म्हणाला, “थोडी निराशा आहे पण काहीवेळा तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यावी लागते. तुम्ही तुमच्या शरीराशी लढू शकत नाही. मला मालिकेतील सर्वोत्तम विकेटवर अधिक गोलंदाजी करायची होती पण ते पहिल्या डावात काही समस्या निर्माण झाल्या नाहीत.
5⃣ matches.
3⃣2⃣ Wickets 🫡
Incredible spells ⚡️#TeamIndia Captain Jasprit Bumrah becomes the Player of the series 👏👏#AUSvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/vNzPsmf4pv— BCCI (@BCCI) January 5, 2025
नियमित कर्णधार रोहित शर्माला शेवटच्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहलाही दुखापत झाली. अशा स्थितीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही. सिडनी कसोटी हरल्यानंतर बुमराहने भारतीय संघाचा बचाव केला, त्याच्या दुखापतीबद्दलही त्याने सांगितले.
IND vs AUS : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताच्या हाती ऑस्ट्रेलियाने हिसकावली! टीम इंडियाचा मालिकेत पराभव
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनेही या मालिकेत २५ विकेट्स घेण्याबरोबरच महत्त्वपूर्ण १५९ धावा केल्या, परंतु जसप्रीत बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार दिला गेला नसता तर तो अन्यायकारक ठरला असता. सिडनी कसोटीत १० बळी घेणाऱ्या स्कॉट बोलंडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बोलंडने पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ४ बळी घेतले. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताला एकदाही २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने पहिल्या डावात केवळ १८५ धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघही १८१ धावाच करू शकला. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले होते, मात्र बुमराहच्या दुखापतीने संघाला सामन्यात खूप मागे टाकले. बुमराहच्या दुखापतीनंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावातही निराशा केली आणि संघ १५७ धावांत गडगडला. ऋषभ पंतच्या ३३ चेंडूत ६१ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताला ही धावसंख्या गाठता आली, अन्यथा संघ १००च्या आतच रोखला गेला असता. ऑस्ट्रेलियाने १६२ धावांचे लक्ष्य ६ गडी राखून पूर्ण केले आणि मालिका ३-१ ने जिंकली