मुंबई : हजारो हौशी धावपटूंनी (Amateur Runner) नुकत्याच मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC Mumbai) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आयआयएफएल जितो अहिंसा रन पावर्ड बाय टॉरेंट ग्रुप’ च्या शर्यतीत भाग घेतला. या अनोख्या स्पर्धेचे आयोजन हे जगभरात शांतता (Peace) आणि अहिंसेचा प्रसार (Spread Of Non Violence) करण्याच्या हेतूने करण्यात आले होते. या स्पर्धेची सुरुवात ही एमएमआरडीए ग्राऊंड्स (MMRDA Grounds) येथून करण्यात आली आणि ही स्पर्धा बीकेसी मधील विविध रस्त्यांवरून जाऊन नंतर पुन्हा फिनिशिंग लाईनकडे आली.
या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून बॉलिवूड कलाकार आदित्य रॉय कपूर उपस्थित होते आणि त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहन दिले. स्पर्धक चार स्थिर अशा भागात म्हणजेच २१ किमी हॉफ मॅरेथॉन, १० किमी, ५ किमी आणि ३किमी ची फन रेस अशा विभागात धावले.
[read_also content=”हा विचार रुजायला हवा! लग्नाच्या दिवशी नववधूने आधी पार पाडले परीक्षेचे कर्तव्य, त्यानंतरच… https://www.navarashtra.com/education/education-priority-ashwini-mhaskar-student-of-jeevandeep-college-goveli-university-of-mumbai-first-prefered-exam-then-got-merried-nrvb-384642.html”]
प्रथमच या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ५०० हून अधिक १२ वर्षांवरील दृष्टिहीन मुलांनी यामध्ये भाग घेतला. या स्पर्धेत भाग घेणार्या सर्वांत ज्येष्ठ महिला म्हणजे ८० वर्षांवरील महिलेने सुध्दा भाग घेतला होता. या रन ने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स सह वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये अहिंसे (हिंसा न करणे) साठी विविध ठिकाणी धावणारे सर्वाधिक धावपटू म्हणून हा विक्रम नोंदवण्यात आला.
या स्पर्धेला उपस्थित मान्यवरांमध्ये अनेक दिग्गज उपस्थित होते यामध्ये श्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह आयुक्त सत्येंद्र चौधरी, अमृता फडणवीस, मोतिलाल ओसवाल, सुभाष रुणवाल, सुखराज नाहर, पृथ्वीराज कोठार, प्रदीप राठोड आणि जयंत जैन यांचा समावेश होता.
जितो अहिंसा हाफ मॅरेथॉनच्या महिला गटात रेश्मा केवाटे विजयी ठरल्या तर पुरुषांच्या खुल्या विभागात विवेक मोरे यांनी स्पर्धा जिंकली. १० किमी धावण्याच्या स्पर्धेतील महिला गटात पुनम सोनोने तर रोहित कुमार हे पुरुषांच्या खुल्या गटातील विजेते ठरले. ज्योती सिंग आणि विराज पाटील हे ५ किमी भागातील अनुक्रमे स्त्री आणि पुरुष गटातील विजेते ठरले.
[read_also content=”त्या आपल्या मित्रांशी गप्पा मारत उभ्या होत्या, एकीच्या वडिलांनी हटकले, दोघींचीही सटकली; अल्पवयीन असल्याने रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल, अन्… https://www.navarashtra.com/crime/crime-news-two-minor-girls-suicide-by-hanging-in-kurze-kompada-talasari-palghar-one-of-the-father-refused-nrvb-384605.html”]
“मुंबईतील आमच्या आयआयएफएल जितो अहिंसा रन ला मिळालेला प्रतिसाद उदंड होता. हा उपक्रम सर्वसमावेशक होता यामध्ये सर्व वयाचे,लिंगाचे, समाजाचे आणि खेळांच्या क्षमतेने युक्त लोक एकत्र येऊन त्यांनी अहिंसा आणि शांततेचा संदेश दिला. जगभरांत प्रथमच भारतातील ६५ शहरांतील १ लाख २० हजारांहून अधिक धावपटू एकाच वेळी धावले. आम्ही विजेते, स्पर्धक आणि या कार्यासाठी योगदान देणार्या प्रत्येकाचे अभिनंदन करतो.” असे जितोच्या मुंबई झोनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले.
“आयआयएफएल जितो अहिंसा रन मुळे ज्यांना काही कारणासाठी धावायचे आहे त्यांच्यासाठी कारण उपलब्ध झाले आहे. हजारो धावपटू आणि प्रेक्षक यांची उपस्थिती पाहणे ही खूपच उत्साहाची गोष्ट असते. या रेस मुळे भारतीयांना शांतता, सहवेदना आणि अहिंसा या समान हेतूने एकत्र आणण्यात आणण्याचे आपले उद्दिष्ट्य पूर्ण झाले आहे. आम्ही स्पर्धक, भागीदार आणि जनतेचे ही स्पर्धा यशस्वी केल्या बद्दल आभार मानतो.” असे जितो च्या मुंबई विभागाचे उपाध्यक्ष महेंद्र जैन यांनी सांगितले.