एकेकाळी लागोपाठ 4 षटकार ठोकत कपिल देवने वाचवला होता फॉलोऑन, पाहा व्हिडीओ
Kapil Dev Net Worth : भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी 1994 मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तेव्हापासून ते टीव्ही प्रेझेंटर आणि समालोचक म्हणून काम करत आहेत. क्रिकेटपासून दूर असूनही कपिल आजही करोडोंची कमाई करत आहे. त्यांचा एक आलिशान बंगलाही आहे. चला तर मग जाणून घेऊया कपिल देव यांची एकूण संपत्ती किती आहे आणि त्यांची इतकी कमाई कुठून होत आहे.
भारतीय रुपयात जवळपास 200 कोटी रुपये कमाई
एका रिपोर्टनुसार, कपिल देव यांची एकूण संपत्ती सुमारे 25 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय रुपयात जवळपास 200 कोटी रुपये. कपिल देव यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसाय आहे. हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू सध्या कॉमेंट्री टीमचा एक भाग आहे आणि हिंदीमध्ये कॉमेंट्री करतो. कपिल देव समालोचक आणि टीव्ही प्रेझेंटर म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या नोकऱ्यांमधून वार्षिक 12 कोटी रुपये कमावतात. 1983 च्या विश्वचषकादरम्यान कपिल देव यांना एका सामन्यासाठी 1500 रुपये मिळत होते.
सध्या कपिल देव आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहतात. कपिल अनेकदा दिल्ली गोल्फ क्लबमध्ये पहाटे गोल्फ खेळताना दिसतो. दिल्ली गोल्फ क्लबपासून त्यांचे घर एक किलोमीटर अंतरावर आहे. कपिलने 1983 मध्ये भारतासाठी ते केले होते जे यापूर्वी कोणीही करू शकले नव्हते. त्याने भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून दिला. 1983 मध्ये भारत पहिल्यांदा चॅम्पियन बनला होता.
एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, कपिल देव यांनी त्यांच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण 225 एकदिवसीय सामने खेळले आणि 27.45 च्या सरासरीने 253 विकेट घेतल्या. फलंदाजीत त्याने 95.07 च्या स्ट्राईक रेटने 3783 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट घेणारे कपिल देव पहिले होते. 134 कसोटी सामन्यात 434 बळी घेतले. तसेच 8 शतकांच्या जोरावर 5248 धावा केल्या. 400 बळी घेणारा आणि 5 हजार धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे.