फोटो सौजन्य - सोशल मीडिया
श्रेयस अय्यर : आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने चमत्कार केला आणि विजेतेपद नावावर केले. त्यानंतर आता आयपीएल २०२५ मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे बऱ्याच संघांमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट राइडर्सने जेतेपद नावावर केले होते. आता पुढील सिझन कोलकाता नाईट रायडर्सची फ्रँचायझी मोठ्या योजना आखण्यामध्ये व्यस्त आहे. फ्रँचायझी आपला चॅम्पियन कर्णधार बदलणार आहे. श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ मध्ये केकेआरचा कर्णधार नसल्याची बातमी आहे. आता अय्यरच्या जागी संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. फ्रेंचायझी लवकरच याची घोषणा करू शकते.
मीडियाच्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवशी संपर्क साधला आहे. केकेआरने सूर्यकुमारला कर्णधारपदाची ऑफर दिल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सूर्यकुमार यादव केकेआरचा कर्णधार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. तो बराच काळ मुंबईकडून खेळत आहे. सूर्यकुमार आता T२० इंटरनॅशनलमध्ये जगातील नंबर वन बॅट्समन आहे आणि तो T२० मध्ये टीम इंडियाचा कर्णधारही आहे. आपणास सांगूया की सूर्यकुमार यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे, त्यामुळे संघाना मर्यादित खेळाडूंना संघामध्ये रिटेन करता येणार नाही. त्यामुळे संघांमध्ये अनेक फेरबदल होताना पाहायला मिळणार आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनवर क्रिकेट प्रेमींची नजर असणार आहे. कारण आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार पदाच्या वादामध्ये अडकला होता. केकेआर सूर्यकुमार यादवचा मुंबई इंडियन्सशी व्यवहार करू शकतो. ट्रेड डीलमध्ये केकेआरचा खेळाडू मुंबईला जाऊ शकतो किंवा केकेआर सूर्याचे पैसे मुंबईला देऊ शकतो. याआधी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या अनेक निर्णयांवर खूश नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. आगामी हंगामापूर्वी मुंबई सूर्याला सोडणार अशी बातमीही आली होती.