Legend 90 League : सुरेश रैना, पठाण, शिखर धवन, हरभजन, यांच्यासारखे स्टार खेळाडू दिसणार क्रिकेट खेळताना, वाचा पूर्ण शेड्यूल
Legend 90 League : शिखर धवन, सुरेश रैना, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन, आरोन फिंच, रॉस टेलरसारखे स्टार खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहेत. हे सर्व महान खेळाडू लेजेंड ९० लीगमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसतील. ही लीग ६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान रायपूरमध्ये होणार आहे. लेजेंड ९० लीगच्या सर्व फ्रँचायझी संघांची नावे जाहीर झाली आहेत.
लेजेंड ९० लीगमध्ये छत्तीसगड वॉरियर्स, हरियाणा ग्लॅडिएटर्स, दुबई जॉइंट्स, गुजरात सॅम्प आर्मी, दिल्ली रॉयल्स, बिग बॉईज, राजस्थान किंग्ज हे ७ संघ सहभागी होत आहेत. छत्तीसगड वॉरियर्सकडे मार्टिन गुप्टिल, सुरेश रैना आणि अंबाती रायुडूसारखे खेळाडू आहेत. दिल्ली रॉयल्सकडे रॉस टेलर आणि शिखर धवनसारखे अनुभव आहेत. हरभजन सिंग हरियाणा ग्लॅडिएटर्सची कमान सांभाळेल. वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो राजस्थान किंग्जचे प्रतिनिधित्व करेल. बांगलादेशचा शाकिब अल हसन दुबई जॉइंट्सकडून खेळेल. लेजेंड ९० लीगचे संचालक शिवेन शर्मा म्हणाले, “आम्ही सर्वोत्तम खेळाडूंसह या अनोख्या ९०-बॉल फॉरमॅट लीगचे आयोजन करण्यास तयार आहोत.
दुबई जॉइंट्स: शकिब अल हसन, थिसारा परेरा, केन्नर लुईस, ड्वेन स्मिथ, केविन ओ’ब्रायन, ब्रेंडन टेलर, लियाम प्लंकेट, एच. मसाकाड्झा, रिचर्ड लेव्ही, ल्यूक फ्लेचर, राहुल यादव, क्रिस्टोफर एम, सिड त्रिवेदी, एस. प्रसन्ना.