महेंद्रसिंग धोनी : आयपीएल २०२४ च्या (IPL 20242) साखळी सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने चेन्नईला 27 धावांनी पराभूत केले. चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या अनेक बातम्या येत आहे. बंगळुरूविरुद्ध झालेला हा सामना एमएस धोनीचा शेवटचा सामना आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. परंतु आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
[read_also content=”क्वालिफायर 1 मध्ये कोण मारणार बाजी? कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने https://www.navarashtra.com/sports/who-will-beat-baji-in-qualifier-1-kolkata-knight-riders-vs-sunrisers-hyderabad-536041.html”]
चेन्नई सुपर किंग्सचा संघ स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यापासून निवृत्तीची बाब चर्चेत आहे. आतापर्यंत याविषयी संघाने किंवा माजी कर्णधाराने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दरम्यान, त्याच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. धोनीने मागील आयपीएल दरम्यान दुखापत झाल्यानंतरही सामना खेळला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघ इंडियन प्रीमियर लीग 2024 मधून बाहेर पडला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा शेवटचा साखळी सामना हरल्याने संघाला प्लेऑफमधील स्थान हुकले. या सामन्यानंतर चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या गावी रांचीला परतला. स्पर्धेतील संघाचा प्रवास संपल्यानंतर 42 वर्षीय धोनीच्या निवृत्तीची बातमी समोर आली.
धोनीला दुखापतीबाबत मोठी अपडेट
सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे की, चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या स्नायू फाटण्याच्या समस्येशी झुंजत आहे. महेंद्रसिंह जखमी असूनही या मोसमातील सर्व 14 साखळी सामने खेळला. आता आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर तो उपचारासाठी लंडनला जाऊ शकतो. त्यानंतरच तो पुढील सीझनमध्ये आयपीएल खेळणार की नाही याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितले जात आहे.