रोहित शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
MI vs RR : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील काल झालेल्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर १०० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. रोहित शर्माला बाद न् देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. आयपीएलचा असा कोणताही हंगाम नाही जिथे वाद निर्माण होत नाहीत. अशा वेळी आता मुंबई इंडियन्सवर पुन्हा एकदा फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. आयपीएलच्या ५० व्या सामन्यात म्हणजेच राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईवर हा आरोप करण्यात आला आहे.
वास्तविक या दोन्ही संघांवर या हंगामात फिक्सिंगचा आरोप झालेला आहे. अद्याप मात्र, हे आरोप ते सिद्ध झालेले नाहीत . १ मे, गुरुवार रोजी झालेल्या सामन्यात, लोकांच्या मते पंचांकडून मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माला मदत करण्यात आली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही तूफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : MI vs RR : मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने रचला इतिहास! असा भीम पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने रिव्ह्यू घेतल्यावर आणि नंतर डीआरएसमध्ये नॉट आऊट घोषित केल्यावर प्रश्न निर्माण केले जात आहे. पंचांकडून मुंबईच्या माजी कर्णधाराला मदत करण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी मुंबई इंडियन्सला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी संघासाठी शतकी भागीदारी केली. जर रोहित शर्माला डीआरएसची साथ मिळाली नसती तर प्रत्यक्षात काही वेगळा परिणाम दिसून आला असता.
राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फजल हक फारुकी गोलंदाजी करत असताना डावाच्या दुसऱ्या षटकात हा प्रकार घडला. या षटकातील पाचवा चेंडू रोहितच्या पॅडवर आदळला आणि पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू आउट असल्याचे जाहीर केले. रोहितला याबद्दल खात्री नव्हती. तो त्याचा पार्टनर रिकलटनसोबत बोलू लागला आणि त्याने शेवटच्या क्षणी रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर तिसऱ्या पंचांनी बॉल ट्रॅकिंगची मदत घेतली आणि सांगण्यात आले की, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला होता, त्यामुळे रोहितला बाद देता येत नव्हते आणि म्हणून मैदानावरील पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागल. या निर्णयामुळे रोहित शर्मा बाद होता होता बचावला. त्यानंतर त्याने ५३ धावांची शानदार खेळी केली.
RCB fans, forget it, Umpire Indians are fully prepared to win the final with the help of the umpires. BCCI is sitting silently while open fixing is happening. Shame on Mumbai Indians and their team.#MIvsRR #RohitSharma pic.twitter.com/Csf4J0k746
— Priyanshu Verma (@iPriyanshVerma) May 1, 2025
या प्रकारानंतर चांगलाच गोंधळ उडाला. पंचांनी रोहित शर्माला मदत केली का? अशा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. डीआरएस नियमांनुसार, पुनरावलोकन घेण्यासाठी १५ सेकंदांचा वेळ देण्यात आलेला असतो.परंतु, जेव्हा रोहितने रिव्ह्यूसाठी सिग्नल केला तेव्हा टायमर ० सेकंद वेळ दाखवत होता. लोकांचा असा विश्वास आहे की १५ सेकंद हा वेळ पूर्ण झाला होता. म्हणून रोहितचे अपील नाकारण्यात यायला हवे होते. असे बोलले जाता आहे.
तसेच दुसरा प्रश्न पंचांच्या निर्णयाबद्दलचा पुढे आला होता. बॉल ट्रॅकिंग रिप्लेमध्ये चेंडूचा एक भाग स्टंपच्या रेषेवर असल्याचे दिसत होते. अशा परिस्थितीत, अनेक युजर्संनी प्रश्न उपस्थित केला की लेग स्टंपच्या बाहेरची खेळपट्टी का मानण्यात आली. खर तर, कोणताही वाद नव्हता परंतु नियमाची समज नसणे हे एक कारण होते. समालोचक दीप दासगुप्ता यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, जेव्हा जेव्हा चेंडू स्टंपच्या अर्ध्या रेषेत दिसतो तेव्हा तो स्टंपवर टाकला गेला असे मानले जात आले आहे. या प्रकरणात तिसऱ्या पंचाचा निर्णय महत्वाचा आणि योग्य होता.