Mohammad Kaif on Siraj : 'तुमचा रोल मॉडल....; बुमराहकडून शिका काहीतरी....'; मोहम्मद कैफने सिराजची काढली खरडपट्टी
Mohammad Kaif on Jasprit Bumrah : मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 311 धावा आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक ७२ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ ६८ धावा करून नाबाद परतला. सलामीवीर सॅम कॉन्स्टंटने 60 धावा केल्या. तर उस्मान ख्वाजाने ५७ धावांचे योगदान दिले. या मालिकेत भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला जसप्रीत बुमराहने शून्यावर बाद केले. मात्र, आता माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने X (Twitter) वर पोस्ट केली आहे.
‘मुलांनी त्यांच्याकडून शिकावे, आपले आदर्श हुशारीने निवडा’
मोहम्मद कैफने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर कोणता आनंद साजरा केला? कोणताही उत्सव नाही, आक्रमक संदेश नाही, त्यांच्या चेहऱ्यावर फक्त हास्य. मुलांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे, आपले आदर्श हुशारीने निवडा. मोहम्मद कैफची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रिकेट चाहत्यांना असा विश्वास आहे की मोहम्मद कैफने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची खरडपट्टी काढली आहे, ज्याने शेवटच्या कसोटीत ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर कांगारू फलंदाजाला आक्रमकपणे निरोप दिला होता.
‘बॉक्सिंग डे टेस्ट’च्या पहिल्या दिवशी काय घडलं?
बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडसह ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याशिवाय आकाशदीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार पॅट कमिन्स नाबाद परतले. स्टीव्ह स्मिथ 111 चेंडूत 68 धावा करून खेळत आहे. त्याचवेळी पॅट कमिन्सने 17 चेंडूत 8 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.