फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सानिया मिर्झा-मोहम्मद शामी : जेव्हा टेनिस स्टार सानिया मिर्झा हीच घटस्फोट झाला होता त्यानंतर अनेक वृत्त मोहम्मद मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झा यांच्या नात्याची आली होती. आता मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झाच्या एका फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोन्ही खेळाडू दुबईमध्ये वेळ घालवत असल्याचा दावा करण्यात आला होता. अलीकडे मोहम्मद शामी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होता. सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोटही घेतला आहे. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर येताच लोकांनी सर्व प्रकारचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली, पण त्याचे सत्य काही वेगळेच आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्यात अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अफवा सुरू आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होऊ लागला ज्यामध्ये दोन्ही खेळाडू ख्रिसमसच्या गेटअपमध्ये दिसत होते. व्हायरल फोटोमध्ये दावा करण्यात आला होता की, दोघेही दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. हे चित्र खरे असल्याचे समजून लोकांनी पोस्ट करणे सुरू केले.
Indian tennis star Sania Mirza and cricketer Mohammad Shami tie the knot, uniting two sporting icons in marriage. #SaniaMirza #MohammadShami #CelebrityWedding #Sports pic.twitter.com/EIR022T1yG
— Khalid khan (@Khalid_Peshawar) December 24, 2024
पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे फोटो पूर्णपणे बनावट आहेत. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार करण्यात आले आहेत. विश्वास न्यूजनुसार, हे 23 डिसेंबर 2024 रोजी फेसबुकवरील वेबसाइटवर प्रथम पोस्ट केले गेले होते, त्यानंतर इतर लोकांनी देखील ते व्हायरल करण्यास सुरुवात केली. पण वेगवेगळ्या स्रोतांद्वारे तपासल्यानंतर हे डीप फेक तंत्रज्ञान वापरून तयार केलेले चित्र असल्याचा दावा या न्यूज पोर्टलने केला आहे.
मोहम्मद शामी आणि टेनिस स्टार यांच्यात आतापासूनच अफवा सुरू झाल्या आहेत. यावर्षी जुलै महिन्यात त्यांच्या लग्नाबाबत वेगवेगळे दावे केले जात होते. पण शामीने एका पॉडकास्टवर याचा इन्कार करत हे पूर्णपणे विचित्र असल्याचे सांगितले. त्यांनी अशा कोणत्याही वृत्ताचा इन्कार केला होता. मीम्स चांगले आहेत, पण कोणाच्याही आयुष्याबाबत अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत, असे ते म्हणाले होते.
शामी सध्या फिटनेस सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. दुखापतीमुळे मोहम्मद शामी २०२३ च्या विश्वचषक म्हणजेच गेल्या एक वर्षापासून टीम इंडियातून बाहेर आहे. अलीकडेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे, जिथे त्याने चमकदार कामगिरी केली. त्यानंतर टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या समावेशाबाबत चर्चा सुरू झाली. पण काल २३ डिसेंबर रोजी बीसीसीआयने स्पष्ट केले की, वेगवान गोलंदाजाला अजून विश्रांतीची गरज असून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात त्याचा समावेश केला जाऊ शकत नाही.
माजी पाकिस्तानी फलंदाज आणि क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर टेनिस स्टार सानिया मिर्झा हैदराबादमध्ये आपले आयुष्य जगत आहे. अलीकडेच त्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. यूएईमधील वर्ल्ड टेनिस लीगमध्येही ती व्यस्त आहे. अशा परिस्थितीत या दोन दिग्गजांबद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवा पूर्णपणे निराधार आहेत.