फोटो सौजन्य – X
WTC नव्या सायकलला सुरुवात झाली आहे, यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारत विरुद्ध इंग्लड, दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाबे यांच्यामध्ये सध्या सामने सुरु आहेत. भारताच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करुन ५ शतक पहिल्याच सामन्यात झळकावले. WTC च्या इतिहासामध्ये सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर आहेत यासंदर्भात जाणुन घ्या.
IND vs ENG : 310 धावा, 5 विकेट्स… 1 शतक! पहिल्या दिनी भारतीय फलंदाजांचा बोलबाला; वाचा सविस्तर
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत आणले आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, टीम इंडियाने 5 विकेट गमावत 310 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने पहिल्या दिनी 114 धावां आणि रवींद्र जडेजाने 41 धावा केल्या आहेत. या मालिकेतील गिलचे हे सलग दुसरे शतक आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील 7 वे शतक आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, गिल 7 शतकांसह सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीयांमध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्माने या चॅम्पियनशिपमध्ये एकूण ९ शतके झळकावली आहेत. तथापि, या मालिकेपूर्वी त्याने रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गिल आता ७ शतकांसह त्याच्या मागे आहे. जर भारतीय कर्णधाराला माजी कर्णधाराला मागे टाकायचे असेल तर त्याला आणखी तीन शतके झळकावावी लागतील.
जर आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाबद्दल बोललो तर इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट १८ शतकांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे. या यादीत त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. रूट व्यतिरिक्त आतापर्यंत कोणताही फलंदाज १५ शतकांचा टप्पा ओलांडू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ १३ शतकांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.