टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra singh Dhoni) हा नेहमी त्याचा खेळ आणि त्याच्याकडील असलेल्या सुपर बाईक्स आणि कारमुळे चर्चेत असतो. धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धोनी कुल अंदाजात एका रेसिंग बाईक वरून रांचीच्या एका स्टेडियम मध्ये प्रवेश करताना दिसत आहे. धोनीच्या या सुपर कुल अंदाजावर त्याचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
सध्या टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रांची येथील त्याच्या घरी आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याची ग्रँड एन्ट्री दिसत आहे. तो बॉलिवूड हिरोप्रमाणे रेसिंग बाइकसह स्टेडियममध्ये प्रवेश करीत आहे. तो स्टेडियमच्या गेटवर पोहोचताच गेटवर उपस्थित सुरक्षा रक्षक त्याला सलाम करतो. मग धोनीही त्याला नमस्कार करुन आत शिरतो.
MS Dhoni salutes the security guard even before the guard salutes him! ? My idol @msdhoni ❤️ pic.twitter.com/BbnFbumeHi
— DIPTI MSDIAN (@Diptiranjan_7) October 19, 2022
धोनी हा सुपर बाईक्स आणि आलिशान गाड्यांचा मोठा चाहता असून त्याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या कार आणि बाईक आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी धोनीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तो पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाची कमान सांभाळणार आहे. दोन वर्षांपूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. मात्र अधोनी अजूनही आयपीएलमध्ये आपली कमाल दाखवत आहे. यंदा पुन्हा धोनी हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार असणार असून त्याच्या नेतृत्वात चेन्नईची टीम काय कमाल करते हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.