फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Mumbai Indians players pay homage to Ram Lalla in Ayodhya : आयपीएल २०२५ चा उत्साह अजूनही कायम आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होईल. लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी, मुंबईचे स्टार खेळाडू गुरुवारी अयोध्येत पोहोचले आणि त्यांनी राम लल्लाचे दर्शन घेतले. यामध्ये सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, दीपक चहर आणि कर्ण शर्मा यांचा समावेश आहे. प्रत्येकाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून फोटो शेअर केले आहेत.
पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग विजेत्या मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंनी गुरुवारी अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेतले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर खेळाडूंनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल २०२५ चा सामना शुक्रवारी (४ एप्रिल) भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामन्यापूर्वी काही खेळाडूंनी अयोध्येत भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले.
One fa𝑴𝑰ly takes the blessings of Lord Rama in Ayodhya 🙏
📸: Tilak Varma & Jaya Chahar/ Instagram #TilakVarma #SuryakumarYadav #DeepakChahar #KarnSharma #IPL #IPL2025 #MumbaiIndians #CricketTwitter pic.twitter.com/oHBFOopvAu
— InsideSport (@InsideSportIND) April 3, 2025
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा आयपीएलचा चौथा सामना असेल. या सामन्यासाठी संघ बुधवारी लखनौला पोहोचला होता. शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल २०२५ च्या सामन्यापूर्वी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, दीपक चाहर आणि कर्ण शर्मा यांसारख्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अयोध्या राम मंदिराचे दर्शन घेतले. सूर्यकुमार यांच्या पत्नी देविशा शेट्टी आणि चाहर यांच्या पत्नी जया या देखील त्यांच्यासोबत होत्या. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने ख्रिसमसनिमित्त खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोटो शेअर केले आहेत.
कोण आहे 27 वर्षीय अर्शद खान? विराट कोहलीची विकेट घेऊन उडवली खळबळ, बंगळुरूच्या फॅन्सला केलं शांत
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्या सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पराभव सामना करावा लागला होता तर दुसऱ्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्स विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे सर्व दोन सामन्याच्या पराभवानंतर मुंबईने आयपीएल २०२५ चा पहिला विजय नावावर केला आहे. मुंबईमधील वानखेडे मैदानावर झालेल्या कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवून आयपीएल २०२५ चा पहिला विजय नावावर गेला आहे. त्यांचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळवला जाणार आहे.