रवींद्र जाडेजा(फोटो-सोशल मीडिया)
Ravindra Jadeja’s big feat : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जेडेजाने खास कामगिरी केली आहे. जगातील नंबर १ कसोटी अष्टपैलू खेळाडूने १५ नोव्हेंबर रोजी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० धावा आणि किमान ३०० विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा जडेजा दुसरा भारतीय आणि जगातील एकमेव चौथा क्रिकेटपटू बनला आहे.
जामनगरमध्ये जन्मलेला रवींद्र जडेजा सध्या कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८८ वा कसोटी सामना खेळत असून त्याला हा पराक्रम साध्य करण्यासाठी फक्त १० धावांची गरज होती. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात १० धावा करत मोठी कामगिरी केली. रवींद्र जाडेजाने गोलंदाजीसह, आधीच ३३८ कसोटी विकेट्स घेण्याची किमया साधली आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
हेही वाचा : IND vs SA : शुभमन गिलच्या दुखापतीबद्दल BCCI ने दिली मोठी अपडेट, सांगितले तो कधी मैदानात परतणार!
रवींद्र जडेजापूर्वी, भारतासाठी फक्त कपिल देव यांनी अशी कामगिरी केलेली आहे. कपिल देव कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स आणि ४,००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्यानंतर इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू इयान बोथम आणि न्यूझीलंडचा दिग्गज डॅनियल व्हेटोरी यांचा नंबर लागतो.
कोलकाता येथे खेळवण्यात येत असेलल्या भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना जडेजाचा भारतासाठी ८८ वा कसोटी सामना आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी आणि ४,००० धावा करणारा जडेजा बोथमनंतरचा दुसरा सर्वात जलद क्रिकेटपटू ठरला आहे. इंग्लंडच्या माजी कर्णधाराने इंग्लंड संघासाठी ७२ व्या कसोटी सामन्यात ही किमया साधली आहे.
रवींद्र जडेजा पहिल्या डावात भारतासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. पहिल्या सत्राच्या शेवटी, तो १५ चेंडूत ११ धावा करत फलंदाजी करत होता. रवींद्र जडेजाच्या आधी, तीन महिन्यांहून अधिक काळानंतर भारतासाठी पहिली कसोटी खेळणाऱ्या ऋषभ पंतनेही इतिहास रचला आहे. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याचा वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा : ‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
कोलकाता येथील कसोटी सामन्यात सेहवागचा भारतासाठी ९० षटकारांचा विक्रम मोडण्यासाठी पंतला एका षटकाराची गरज असताना त्याने ३८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर केशव महाराजांना षटकार ठोकून हा टप्पा गाठला.






