सौरव गांगुली(फोटो-सोशल मीडिया)
Sourav Ganguly on politics : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखला जातो. अशातच त्याने आपल्याला राजकणात येण्यास कोणताही रस नाही असे स्पष्ट सांगितले. गांगुली म्हणाला की, दरवर्षी त्याला राजकारणात येण्याच्या ऑफर येत असतात, परंतु ते त्याच्या स्वभावाला अनुरूप नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.
२०२६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. याबाबत गांगुलीला विचारण्यात आले की, तो कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकतो का? तेव्हा त्यावर तो हसला आणि म्हणाला की, मला रस नाही. जरी मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली गेली तरी तो त्यासाठी तयार होणार नाही. गांगुली म्हणाला की, ‘तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाही. मला दरवर्षी राजकारणात येण्याच्या ऑफर येतात, परंतु मला वाटत नाही की ते माझ्या नियंत्रणात आहे.”
हेही वाचा : IND Vs ENG : जसप्रीत बूमराहचा पंजा; इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर संपला, भारताकडे ६ धावांची आघाडी..
पुढे गांगुलीने के कबूल केले की देश आणि राज्याची प्रगती थेट सरकार आणि त्याच्या नेतृत्वाशी जोडलेली आहे, म्हणून गांगुली एक नागरिक म्हणून राजकारणावर लक्ष ठेवून असतो. गांगुली म्हणाला की, “मी राजकारणात नाही, पण मी पाहतो, कारण राज्य आणि देशाची प्रगती कोण राज्य करत आहे यावर निर्भर असते.”
गेल्या काही वर्षांमध्ये सौरव गांगुलीचे नाव भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत जोडले जात आहे. २०२१ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील ते भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी चर्चा झाली होती, परंतु तेव्हा गांगुलीने तेव्हाही राजकीय इनिंग सुरू करण्यास स्पष्ट नकार दिला होता. आता २०२६ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा गांगुली राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा तीव्र होत आहेत, परंतु त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की गांगुली सध्या राजकारणात येण्याच्या मानसिकतेत नाही.
हेही वाचा : ‘रोहित-कोहली २०२७ च्या विश्वचषकात दिसणार नाहीत’, माजी भारतीय खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी…
तसेच गांगुलीने त्यांच्या बायोपिकबद्दल देखील एक मोठा खुलासा केला आहे. गांगुलीने सांगितले की “त्याचा बायोपिक २०२६ च्या अखेरीस प्रदर्शित होणार असून त्यामध्ये राजकुमार राव मुख्य भूमिका सकरणार आहे. तसेच जानेवारी २०२६ पासून चित्रीकरण सुरू होणार आहे.'”