फोटो सौजन्य - Punjab Kings सोशल मीडिया
Priyansh Arya’s Century : आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या पंजाब किंग्जने २५ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात केली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पंजाब एका नवीन कर्णधारासह एका नवीन अवतारात आला आहे. आज या सीझनचा २२ वा सामना सुरु यामध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात प्रियांश आर्य नावाच्या एका अनकॅप्ड खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे आणि या खेळाडूने त्याच्या पहिल्याच सामन्यात प्रभावित केले. ८ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रियांशने एक काम अपूर्ण सोडले होते.
प्रियांशने त्याचे आयपीएल पदार्पण संस्मरणीय बनवले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तथापि, तो अर्धशतक झळकावण्यास हुकला. हा तरुण डावखुरा फलंदाज रशीद खानच्या फिरकी गोलंदाजीसमोर अडकला आणि ४७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला, परंतु त्याच्या खेळीदरम्यान प्रियांशने मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा सारख्या गोलंदाजांचा सामना केला आणि शानदार फटके खेळली आहेत.
From 67(32) to 102(39) 🔥
Priyansh Arya reached his 💯 in the blink of an eye ✨
Updates ▶ https://t.co/HzhV1Vtl1S #TATAIPL | #PBKSvCSK | @PunjabKingsIPL pic.twitter.com/0KdfKyvbgm
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
मग ८ एप्रिलची तारीख आली. पंजाब संघ त्यांच्या घरच्या मैदान मुल्लापूरवर हंगामातील दुसरा सामना खेळण्यासाठी आला होता. त्यांच्यासमोर पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज होता. प्रियांशने या सामन्यात वादळ निर्माण केले आणि १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. एवढेच नाही तर त्याने ३९ चेंडूत पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. हे आयपीएलमधील पंजाबचे दुसरे सर्वात जलद शतक आहे आणि आयपीएलमधील संयुक्तपणे चौथे सर्वात जलद शतक आहे. प्रियांशने या सामन्यात ४२ चेंडूत सात चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने १०३ धावा केल्या.
सिराजने टाकलेल्या पहिल्या षटकात प्रियांशने खेळलेला फ्लिक या खेळाडूकडे दर्जेदार आणि आत्मविश्वास असल्याचे दर्शवितो. प्रियांश आर्याने शानदार फलंदाजीची झलक दिल्ली प्रीमियर लीगमध्ये जेव्हा तो खेळाला होता तेव्हा पाहायला मिळाली. सप्टेंबर २०२४ मध्ये खेळल्या गेलेल्या या लीगमध्ये प्रियांशने १० सामन्यांमध्ये एकूण ६०० धावा केल्या. पंजाबने त्याला ३.८ कोटी रुपयांना संघात घेतले होते. २०२४-२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने भुवनेश्वर कुमार आणि पियुष चावला यांच्याविरुद्ध जोरदार धावा केल्या. तो लांब षटकार मारतो. याच कारणास्तव, राजस्थान रॉयल्सनेही त्याच्यासाठी बोली लावली.