फोटो सौजन्य - IndianPremierLeague
पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याचा अहवाल : धर्मशाळा येथे पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने सुरुवातीपासूनचा दबदबा दाखवला आणि त्याला त्याचा फायदा झाला. आजच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सला 37 धावांनी पराभूत करून दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात एकीकडे पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी कमालीचा खेळ दाखवला तर दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचे फलंदाज फेल ठरले. संघाने विकेट गमावल्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आजच्या सामन्यात कशी राहिली दोन्ही संघाची कामगिरी यावर नजर टाका.
लखनौ सुपर जायंट्सची फलंदाजी आजच्या सामन्यात अत्यंत निराशाजनक राहिली आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या आज सुरुवातीचा एकही फलंदाजाने २० चा आकडा पार केला नाही. त्यामुळे लखनौचे हे एक पराभवाचे कारण असू शकते. त्यामुळे नंतर आलेले फलंदाज चांगली खेळी खेळले पण ते लक्ष्यपर्यत पोहोचू शकले नाही. अब्दुल समद आणि आयुष बडोनी या दोघांनी संघासाठी चांगली भागीदारी केली. या दोघांनी आजच्या सामन्यात ६० धावांची भागी दारी केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये उभे केले होते पण विजयापर्यत नेऊ शकले नाही.
Match 54. Punjab Kings Won by 37 Run(s) https://t.co/YuAePC273s #PBKSvLSG #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
अब्दुल समद याने संघासाठी सहाव्या विकेटसाठी २४ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या, यामध्ये त्याने ४ षटकार आणि २ चुकार मारले. आयुष बडोनी याने संघासाठी कमालीची खेळी खेळली आणि संघासाठी दुसरे अर्धशतक या सीझनचे नावावर केले. आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा आयुष बडोनी याने संघासाठी ४० चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या त्यामध्ये त्याने ५ षटकार आणि ५ चौकार मारले. लखनौ सुपर जायंट्ससाठी अब्दुल समद आणि आयुष बडोनी हे दोघेच फलंदाज लढले. त्याचबरोबर शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना आवेश खान फलंदाजीला आला होता. त्याने आजच्या सामन्यात १० चेंडूंमध्ये १९ धावा केल्या, कौतुकास्पद म्हणजेच त्याने यामध्ये १ षटकार आणि ३ चौकार मारले.
KKR vs RR : 1 धावेने…1,2, 3 नाही तर 15 पराभव! राजस्थान रॉयल्सच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम
पंजाब किंग्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर अर्शदीप सिंह याने आज ४ ओव्हरमध्ये संघाला दमदार सुरुवात करून दिली आणि संघाला ३ विकेट मिळवून दिले. यामध्ये त्याने एडन मार्करम, मिचेल मार्श आणि निकोलस पुरण या तीन फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. अफगाणी गोलंदाज अझमतुल्लाह उमरझाई याने संघासाठी २ विकेट्सची कमाई केली. मार्को यांसन याने संघाला १ विकेट मिळवून दिले. शेवटच्या ओव्हरमध्ये युझवेन्द्र चहलच्या हाती १ विकेट लागली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने आयुष बडोनी याला आऊट केले.