फोटो सौजन्य - Star Sports
प्रो कबड्डी लीगच्या नव्या सीझनला सुरुवात झाली आहे आणि या नव्या सीजनमध्ये अनेक नियम बदलले आहेत त्याचबरोबर अनेक नवे खेळाडू सामील झाले आहेत. दररोज दोन सामने खेळवले जात आहेत आणि या दोन्ही सामन्यांमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. पहिला सामना हा यु मुंबा विरुद्ध बंगलोर बुल्स यांच्यात खेळवण्यात आला. तर दुसरा सामना हा हरियाणा स्टीलर्स विरुद्ध युपी योद्धा या दोन संघांमध्ये झाला.
धावबाद होऊनही परतला Narayan Jagadeesan, फक्त तीन धावांनी हुकलं द्विशतक! दुलिप ट्राॅफीत केला कहर
काल रात्री 05 सप्टेंबर रोजी प्रो कबड्डी लीगमध्ये हरियाणा स्टीलर्स आणि यूपी योद्धा या दोन संघामध्ये सामना खेळवण्यात आला होता. हा सामना विश्वनाथ स्पोर्ट्स क्लब, विझाग येथून थेट प्रक्षेपित करण्यात आला. सामना खूपच स्फोटक झाला आणि हरियाणाने जोरदार पुनरागमन केले आणि विजय नोंदवला. सामन्यादरम्यान स्टीलर्सचा विजय नव्हे तर प्रशिक्षकाची अनोखी शैली सर्वाधिक चर्चेचा विषय बनली. एका वेळी तर तो सामन्यादरम्यान पंचांशीही भिडला आणि विजयानंतर त्याने जबरदस्त शैलीत आनंद साजरा केला.
प्रो कबड्डी लीगमध्ये हरियाणा स्टीलर्सचे प्रशिक्षक मनप्रीत सिंग सामन्याच्या शेवटच्या दोन मिनिटांत पंचांशी भांडताना दिसले. पंचांनी सांगितले की मनप्रीत मध्येच बोलून रेडमध्ये अडथळा आणत आहे. प्रत्युत्तरात मनप्रीतने स्पष्ट केले की तो असे काहीही करत नाही. यामुळे चाहत्यांचा उत्साहही वाढला आणि सामन्याचा उत्साह द्विगुणित झाला. नंतर मनप्रीत त्याच्या जागेवर जाऊन बसला.
Never change, coach sahab! 🔥🤩💙
NEXT ON Pro Kabaddi 👉 Patna Pirates 🆚 Bengaluru Bulls | SAT, 6th SEP, 7.30 PM on Star Sports Network & JioHotstar
[Manpreet Singh, Haryana Steelers, Pro Kabaddi League] pic.twitter.com/YYAu9FADKT
— Star Sports (@StarSportsIndia) September 5, 2025
पहिला डावामध्ये असलेले हरियाणा स्टीलर्सने सामना ३७-३२ असा सानना नावावर केला आणि यूपी योद्धास पीकेएल २०२५ मधील पहिला पराभव दिला. यानंतर, मनप्रीत सिंगने वेगळ्या पद्धतीने आनंद घेतला आणि मिशा फिरवून आनंद साजरा केला. एकेकाळी हरियाणा १०-१७ असा पिछाडीवर होता आणि त्यानंतर, संघाने पुनरागमन करण्यात मनप्रीतने मोठी भूमिका बजावली. त्याने मध्यभागी आपल्या खेळाडूंना प्रेरित केले. यानंतर परिस्थिती बदलली आणि सामना हरियाणाच्या बाजूने गेला.
पीकेएलच्या १२ व्या हंगामाची सुरुवात यूपी योद्धासाठी चांगली झाली. त्यांनी त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकले. त्यांना हरियाणा स्टीलर्सचा पराभव करून तिसरा सामना जिंकायचा होता. तथापि, स्टीलर्सने विजय नोंदवून त्यांची विजयी मालिका थांबवली. यासह, हरियाणाने हंगामातील दुसरा विजय मिळवला.