पंतप्रधान मोदींनी घेतली जगज्जेत्या भारतीय महिला संघाची भेट(फोटो-सोशल मीडिया)
Prime Minister Modi meets Indian women’s team : भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. विश्वचषकाच्या अंतम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ५२ धावांनी पराभूत करत जेतेपदावर नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आज भारतीय महिला संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहचला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी महिला विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली आहे. या क्षणाचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने रविवारी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारून विश्वचषकाचे पहिले वहिले जेतेपद जिंकले आहे. या भेटीदरम्यान, कर्णधाराने २०१७ मध्ये ट्रॉफीशिवाय पंतप्रधान मोदींना भेटलेल्या क्षणाची आठवण करून दिली. स्मृती मानधना म्हणाली की, की पंतप्रधान सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्ति आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे भारतीय महिला संघाचे अभिनंदन करणारा संदेश देखील शेअर केला आहे.
भारतीय महिला खेळाडूंशी भेट घेत पंतप्रधान मोदींकडून संपूर्ण संघाचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले. लागोपाठ तीन पराभव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर पंतप्रधानांनी स्पर्धेत संघाच्या प्रभावी पुनरागमनाचे कौतुक केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी महिला विश्वचषक विजेत्या संघाच्या भेटीचे आयोजन केले होते. भारतीय महिला क्रिकेट संघ मंगळवारी एका खास चार्टर्ड स्टार एअर विमानाने दिल्लीत दाखल झाला. दिल्लीत, खेळाडूंना कडक सुरक्षेत विमानतळावरून त्यांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर सर्व खेळाडू त्यांच्या घरी परतणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज लोक कल्याण मार्ग स्थित अपने आवास पर महिला विश्व कप चैंपियन टीम की मेज़बानी की। प्रधानमंत्री ने टीम को जीत के लिए बधाई दी और लगातार तीन हार और सोशल मीडिया पर ट्रोलिंग का सामना करने के बाद टूर्नामेंट में उनकी शानदार वापसी की सराहना की। pic.twitter.com/TOtSophrxc — ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2025
भारतीय महिला संघाचे दिल्लीत आगमन झाल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले होते. हॉटेलमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचे ढोल, फुले आणि जयजयकाराने स्वागत करण्यात आले. भारतीय महिला संघानकडून केक कापून हा आपला ऐतिहासिक विजय साजरा करण्यात आला आहे.






