दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
Indian squad announced for Test series against South Africa : या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. पंत यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला होता, परंतु चौथ्या कसोटीत दुखापत झाल्यामुळे त्याला मालिके बाहेर जावे लागले होते. आता तो तंदरूस्त झाला असून पुन्हा विरोधी संघाला जेरिस आनण्यास सज्ज झाला आहे.
दरम्यान, स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा गोलंदाज मोहम्मद शमीला मात्र पुन्हा संघात परतण्यासाठी वाट बघावी लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये दुसरा सामना खेळला जाईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत शुभमन गिल पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व केलेले आहे. गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत देखील संघाचे नेतृत्व करून मालिका जिंकली होती.आता, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या मालिकेत कर्णधार म्हणून पुन्हा मैदानात उतरणार आहे. पुनरागमन करणारा विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत उपकर्णधार म्हणून देखील काम पाहणार आहे.
वेगवान गोलंदाज आकाशदीपला देखील यावेळी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच अनुभवी गोलंदाज बुमराह आणि सिराज हे नवीन चेंडू हातळणार आहेत, तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू म्हणून संघाला संतुलन प्रदान करतील.
अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या मोहम्मद शमीला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. संघ व्यवस्थापनाने आकाशदीप आणि मोहम्मद सिराजवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. अलिकडेच मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफी सामन्यात लांब स्पेल टाकले आणि विकेट्स देखील चटकावल्या आहेत. या वर्षीच्या रणजी हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने एकूण १५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या कामगिरीनंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी दिली देण्यात येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु तसे होऊ शकले नाही.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक) (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आकाश दीप.
कसोटी मालिकेव्यतिरिक्त, बीसीसीआयने भारत अ वनडे संघाची देखील घोषणा केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. तथापि, या दोन्ही खेळाडूंची नावे अद्याप जाहीर केलेल्या संघात समाविष्ट नाहीत.
टिळक वर्मा (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उप-कर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, निशांत सिंधू, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), खलकेल अहमद आणि विकेटकीपर.






