झंडू कुमारने जिंकले कांस्यपदक (फोटो- ट्विटर)
झंडू कुमारने पहिल्या प्रयत्नांत 181 किलो आणि दुसऱ्या फेरीत 190 किलो वजन उचचल्याचे दिसून आले. यानुसार त्याला त्या ठिकाणी 130.9 किलो गटात कांस्यपदक मिळाले आहे. 196 किलोचे वजन उचलण्यात खेळाडू झंडू कुमार यशस्वी ठरला. दरम्यान भारताने राष्ट्रकूल स्पर्धेत पहिले पदक मिळवले आहे.
‘जिद्द, मेहनत आणि दृढ संकल्प’! कॉमनवेल्थ गेम्ससाठी PM Modi यांनी दिल्या खेळाडूंना खास शुभेच्छा
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या दुसऱ्या दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. ‘झंडू कुमार यांनी कामगिरी अत्यंत शानदार! कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पुरुषांच्या हेवीवेट पॅरा-पावरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचे खाते उघडले आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी मिळवलेले यश म्हणजे त्यांची मेहनत, संकल्प आणि शिस्तबद्ध मेहनतीचे उदाहरण आहे. त्यांनी केलेली कामगिरी असंख्य भारतीयांना प्रेरणा देणारी आहे.
झंडू कुमार बिहारच्या नालंदा जिल्ह्याचा रहिवासी आहे. 29 वर्षीय झंडू कुमारने भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली आहे. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने भाजी विक्री करायचा. तसेच ई-रिक्शा देखील चालवली आहे. 2017 मद्धये त्याने पॅरा-ॲथलेटिक्समध्ये सुरुवात केली. त्यानंतर त्याने पॉवरलिफ्टिंगमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली.
A spectacular performance by Jhandu Kumar, who has opened India’s medal tally at the #CWG2026 by winning a Bronze in the Men’s Heavyweight Para Powerlifting event! Congratulations to him. His achievement is a powerful reflection of immense strength, unwavering determination and… pic.twitter.com/kMdkU6RRAF — Narendra Modi (@narendramodi) July 25, 2026
‘कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यावर जेव्हा आपल्या देशाचा तिरंगा उंचावला गेला. हे माझे पहिले कॉमनवेल्थमधील पदक आहे. तसेच संपूर्ण देशासाठी पदक जिंकल्याचा मला अभिमान आहे, असे झंडू कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.






