मोठी बातमी! MCA अध्यक्षपदाचा राजकीय तिढा सुटला (Photo Credit - X)
Ajinkya Naik MCA President: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या आगामी निवडणुकांसाठी सुरू असलेली जोरदार राजकीय रस्सीखेच अखेर संपुष्टात आली असून, अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. एमसीए पदाधिकारी, ॲपेक्स कौन्सिल आणि टी२० मुंबई गव्हर्निंग कौन्सिलच्या निवडणुका १२ नोव्हेंबर रोजी होणार होत्या, मात्र अध्यक्षपदाचा तिढा अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी सुटला.
MCA president Ajinkya Naik addresses media after being elected as Mumbai Cricket Association president unopposed. @IExpressSports pic.twitter.com/cXqTUXkPH8 — Devendra Pandey (@pdevendra) November 10, 2025
अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडल्यामुळे आता उर्वरित पदांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
| पदाचे नाव | प्राप्त अर्जांची संख्या |
| उपाध्यक्ष | ९ |
| सचिव | १० |
| सहसचिव | ९ |
| खजिनदार | ८ |
| कार्यकारिणी सदस्य | ४८ |
या सर्व पदांसाठी १२ नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडेल आणि त्यानंतर एमसीएच्या नवीन कार्यकारिणीचे चित्र स्पष्ट होईल.
राजकीय नेत्यांची चुरस
या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे चांगलीच रंगत आली होती. अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रसाद लाड (भाजप नेते), जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस नेते), मिलिंद नार्वेकर (शिवसेना ठाकरे गट) आणि विहंग सरनाईक (परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव) यांनीही अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय डावपेचात कोण बाजी मारणार, याबद्दल उत्सुकता होती.
प्रसाद लाड यांनी अर्ज मागे घेतला
अर्ज मागे घेण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना, भाजप नेते प्रसाद लाड एमसीए कार्यालयात पोहोचले. एमसीए अध्यक्ष दालनात अजिंक्य नाईक आणि प्रसाद लाड यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे, अजिंक्य नाईक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
MCA अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी नाट्य!
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असताना, अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली असली तरी, त्यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील नाट्य अद्याप संपलेले नाही. नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर शहर दिवाणी न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली असून, निर्णय राखून ठेवला आहे.
‘कुलिंग पीरियड’मुळे उमेदवारीला आव्हान
एमसीए अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले शाहआलम शेख यांनी अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान दिले होते. शेख यांच्या म्हणण्यानुसार, ‘कुलिंग पीरियड’ (Cooling Period) च्या नियमानुसार अजिंक्य नाईक हे निवडणूक लढवू शकत नाहीत. याउलट, अजिंक्य नाईक यांचा दावा आहे की, सचिव आणि अध्यक्षपद यांचा कार्यकाळ एकच असल्याने कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असली तरी, न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
स्वत: चाच पुतळा पाहून सुनील गावस्कर झाले भावूक! MCA ला दिली आईची उपमा, पहा Photo






